कोलकाताने विजयासह मुंबई इंडियन्सला दिला सर्वात मोठा धक्का, एका सामन्याने सर्व गणितच बिघडले…


शारजा : कोलकाता नाइट रायडर्सने आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्वर ८६ धावांनी विजय मिळवला आणि त्यामुळे मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण केकेआरच्या या विजयाने प्ले-ऑफचे सर्व समीकरणच बदलून गेले आहे. कारण कोलकाताने या सामन्यात फक्त विजय मिळवला नाही, तर या विजयासह त्यांनी आपला रनरेटची सुधारला आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला कोलकाता नाइट रायडर्सचे १४ गुण झाले आहेत, पण उद्या मुंबईचा संघ जिंकला तर त्यांचेही १४ गुण होऊ शकतात. पण केकेआरचा रनरेट हा +०.५८७ एवढा आहे, तर मुंबईचा -०.०४८ एवढा आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या रनरेटमध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सला या विजयानंतर मोठा धक्का बसला आहे.

केकेआरने आजच्या महत्वाच्या सामन्यात नेत्रदीपक कामगिरी केली. सलामीवीर शुभमन गिलच्या अर्धशतकाच्या जोरावर केकेआरने राजस्थानपुढे १्७२ धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या संघाची त्रेधा उडाल्याचे पाहायला मिळाले. कारण डावाच्या सुरुवातीपासूनच राजस्थानच्या संघाला धक्के बसत गेले आणि त्यांनी दयनीय अवस्था झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे राजस्थानचा हा सामना हरणार हे निश्चित झाले होते, पण एवढ्या मोठ्या फरकाने पारभूत होईल असेल कोणालाही वाटले नव्हते. कारण आतापर्यंतचं प्ले-ऑफचं सर्व गणित हे केकेआरचा संघ पराभूत किंवा अटीतटीच्या लढतीत विजय मिळवेल, असे रचले गेले होते. पण या सामन्यात केकेआरच्या संघाने तब्बल ८६ धावांची विजय मिळवला आणि त्यानंतर मुंबई इंडियन्सचे धाबे दणाणल्याचे पाहायला मिळाले. कारण केकेआरने एवढा मोठा विजय साकारल्यावर आता मुंबई इंडियन्ससाठी प्ले-ऑफची लढाई कठीण बनलेली आहे. कारण आता मुंबई इंडियन्सने भरपूर मोठ्या फरकाने विजय मिळवता आला तरच त्यांना प्ले-ऑफमध्ये पोहोचता येणार आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा मुंबई इंडियन्सचा संघ हा चम्तकार शुक्रवारच्या सामन्यात करू शकतो की नाही, याकडे तमाम क्रिकेट विश्वाचे उद्या लक्ष लागलेले असेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: