दुचाकी पुलावरून नदीत कोसळली; १ जण ठार, दुसरा गंभीर जखमी


हायलाइट्स:

  • दुचाकी पुलाला धडकून नदीत कोसळली
  • एक जण ठार, तर दुसरा गंभीर जखमी
  • जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू

अमरावती : मोर्शी येथून अमरावतीकडे जाणाऱ्या भरधाव दुचाकी पुलाला धडकून नदीत कोसळल्याने एक जण ठार झाला आहे, तर अन्य एक युवक गंभीर झाला. ही घटना बुधवारी टोलनाक्याच्या जवळ असलेल्या दातपाडी नदीच्या पुलावर घडली.

दानिश अहमद आसिफ अहमद (वय २२ रा. ताजनगर मोर्शी) असं घटनेतील मृतकाचं नाव असून शेख मज्जमीर शेख हनी (वय १९, रा. ताजनगर मोर्शी) हा गंभीर जखमी आहे.

रेल्वेचे गेट बंद न केल्याने झाला भीषण अपघात; गेटमनला न्यायालयाने सुनावली शिक्षा

घटनेबाबत सविस्तर वृत्त असं की, शेख मज्जमीर शेख हनी व त्याचा मित्र दानिश अहमद आसिफ अहमद दुचाकीने मोर्शी येथून वैद्यकीय कामासाठी अमरावतीकडे भरधाव येत असताना सकाळी साडे सात वाजताच्या दरम्यान भरधाव दुचाकी टोलनाक्यानजीक असलेल्या दातपाडी नदीच्या पुलाला धडकली व पुलाचे कठडे तोडून दोघेही दुचाकीसह नदीत कोसळले. यामध्ये मागे बसलेला दानिश अहमद आसिफ अहमद याचा नदीत बुडून मृत्यू झाला, तर चालक शेख मज्जमीर शेख हनी हा गंभीररीत्या जखमी झाला.

दरम्यान, दुर्घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली. नांदगाव पेठ पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी व मृतकाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. नांदगाव पेठ पोलिसांनी पंचनामा करून आरोपी चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: