मोठी बातमी: मुंबईतील ‘या’ स्टेशन्सवर फलाट तिकीट पुन्हा ५० रुपये!


हायलाइट्स:

  • मध्य रेल्वेने फलाट तिकिटाचे दर पुन्हा वाढवले.
  • सहा रेल्वे स्थानकांवर फलाट तिकीट ५० रुपये.
  • पश्चिम रेल्वेचा तिकीट दराबाबत निर्णय नाही.

मुंबई: नातेवाईकांना रेल्वे स्थानकांवर सोडायला जाणाऱ्या प्रवाशांना आता फलाटावर पोहचण्यासाठी ५० रुपये मोजावे लागणार आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ‘ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ‘सह सहा रेल्वे स्थानकांतील फलाट तिकीट ५० रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ आज, शुक्रवारपासून लागू होणार आहे. ( Mumbai Platform Ticket Latest News )

वाचा: नवाब मलिक यांचा NCBवर गंभीर आरोप; उद्या मोठा गौप्यस्फोट करणार!

सण-उत्सवांच्या काळात मेल-एक्स्प्रेसला वाढलेला प्रतिसाद पाहता रेल्वे स्थानकातील अतिरिक्त गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फलाट तिकीट दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, पनवेल या स्थानकातील फलाट तिकीट वाढवण्यात आले आहे.

वाचा: VGN ज्वेलर्सच्या मालकाला अटक; ८ कोटींची फसवणूक, ‘ते’ आमिष दाखवून…

करोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत फलाट तिकीट १० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आले होते. दरम्यान, करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येचा मोठा उद्रेक झाला आणि फलाट तिकीट देणे बंद करण्यात आले. आता करोना स्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे सण-उत्सवांसाठी व अन्य कारणांसाठी नागरिकांचा रेल्वे प्रवास पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी अनेक रेल्वे स्थानकात प्रवाशांकडून फलाट तिकिटांची मागणी होत असल्याने मध्य रेल्वे मुंबई विभागाने फलाट तिकीट दरात पाचपट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने मात्र फलाट तिकीट दरात अद्याप कोणतीही वाढ केलेली नाही.

वाचा: आर्यन खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; NCBची ‘ती’ विनंती कोर्टाने फेटाळलीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: