bjp national executive : राष्ट्रीय कार्यकारिणीत नेत्याचे नाव, पण नाचक्की होण्याची भाजपला भीती


नवी दिल्ली: भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित होताच पश्चिम बंगाल भाजपला ( bjp national executive committee ) एक भीतीही वाटू लागली आहे. पश्चिम बंगाल भाजपला पक्षाची नाचक्की होण्याची भीती आहे. कारण पश्चिम बंगालमधील एका नेत्याच्या नावाचा समावेश हा राष्ट्रीय कार्यकारिणीत करण्यात आला आहे. पण बऱ्याच दिवसांपासून हा नेता तृणमूल काँग्रेसमध्ये परतणार अशी चर्चा आहे.

तृणमूलमध्ये तर जणार नाही ना राजीव बॅनर्जी?

पश्चिम बंगालमधील भाजप नेते राजीव बॅनर्जी यांच्याबाबत सतत ही भीती व्यक्त केली जात आहे. राजीव बॅनर्जी हे यापूर्वी तृणमूल काँग्रेस सरकारमध्ये मंत्री होते आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. बॅनर्जी यांनी भाजपच्या तिकिटावर दोमजूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा पराभव झाला. तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला.

‘राज्यातून कुठलीही फिडबॅक घेतला नाही’

राष्ट्रीय कार्यकारिणीत बॅनर्जी यांचे नाव समाविष्ट करण्यापूर्वी पश्चिम बंगाल भाजपकडून कोणताही फिडबॅक घेण्यात आला नाही. पश्चिम बंगालच्या भाजप नेत्यांसाठी त्यांचे नाव कार्यकारिणीत येणे हे आश्चर्यापेक्षा कमी नाही, असं पक्षाच्या सूत्रांनी सांगितलं. राजीव बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात चर्चा सुरू आहे आणि ते लवकरच तृणमूल काँग्रेसमध्ये जाऊ शकतात. बॅनर्जी यांचे नाव राष्ट्रीय कार्यकारिणीत समाविष्ट करण्यासाठी कोणी सुचवले? हे आम्हाला माहीत नाही, असं पक्षाच्या एका स्थानिक नेत्याने सांगितले.

bjp national executive : भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीतून गांधी मायलेकांना डच्चू, महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांची

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि अनेकांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूकही लढवली होती. पण निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत आली. त्यानंतर तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांची एक प्रकारे घर वापसी सुरू केली. अनेक नेते भाजपमधून परत तृणमूल काँग्रेसमध्ये गेले आहेत.

navjot singh sidhu : सिद्धूंच्या १ हजार वाहनांच्या ताफ्याला यूपी पोलिसांनी लावला ब्रेक! सहारनपूरमध्ये घेSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: