समाजाला प्रगतीच्या दिशेने नेणारे राजर्षी शाहूंचे विचार आजही दिशादर्शक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

समाजाला प्रगतीच्या दिशेने नेणारे राजर्षी शाहूंचे विचार आजही दिशादर्शक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Rajarshi Shahus thoughts leading society towards progress are still a guideline – Chief Minister Uddhav Thackeray

मुंबई,दि.६ – सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते, रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे.

शिक्षण,आरोग्य,महिला सबलीकरण,जातीअंताचा लढा यांसह कृषी- सिंचन, औद्योगिक क्षेत्रांतील विकासात्मक दृष्टी यातून समाजाला प्रगतीच्या दिशेने नेणारे राजर्षी शाहूंचे विचार आजही दिशादर्शक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात,राजर्षी शाहू महाराजांनी लोकाभिमुख आणि समतामुलक कार्याचा आदर्श घालून दिला.शिक्षणातून समाजाला शहाणे करण्यासाठी आणि सामाजिक समता सुधारणांबाबत त्यांनी क्रांतीकारक अशी पावले उचलली. समाजाला प्रगतीच्या दिशेने नेणारे राजर्षी शाहूंचे विचार आजच्या काळातही दिशादर्शक आणि क्रांतीकारक आहेत. त्यांच्या या कार्याला कोटी-कोटी प्रणाम आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यस्मृतींना विनम्र अभिवादन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: