पेट्रोलियम कंपन्यांना अच्छे दिन! मुंबईत डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर, जाणून घ्या आजची दरवाढ


हायलाइट्स:

  • आज शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलची भाव वाढ केली.
  • आज देशभरात पेट्रोल ३० पैसे आणि डिझेल ३५ पैशांनी महागले.
  • दरवाढीमुळे ऐन सणासुदीच्या हंगामात महागाई वाढण्याची शक्यता आहे.

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलची भाव वाढ केली. आज देशभरात पेट्रोल ३० पैसे आणि डिझेल ३५ पैशांनी महागले. या दरवाढीने मुंबईत पेट्रोल १०९.५४ रुपये झाले असून डिझेलचा भाव शंभरीपासून एक पाऊल दूर आहे. एक लीटर डिझेलचा भाव ९९.९२ रुपये झाला आहे. दरवाढीमुळे ऐन सणासुदीच्या हंगामात महागाई वाढण्याची शक्यता आहे.

दिवाळीत कर्ज स्वस्त होणार? रिझर्व्ह बँंक थोड्याच वेळात जाहीर करणार पतधोरण
कंपन्यांनी केलेल्या दरवाढीने मागील ११ दिवसात पेट्रोलमध्ये २.३५ रुपयांची वाढ झाली आहे. तर १३ दिवसांत डिझेल ३.५० रुपयांनी महागले आहे. अच्छे दिन येणार या आशेने वाट पहात असलेल्या सर्वसामान्यांसाठी वाढती महागाई डोकेदुखी बनली आहे. सामान्यांसाठी स्वप्नवत असले तरी प्रत्यक्षात दरवाढीमुळे पेट्रोलियम कंपन्यांना अच्छे दिन आले असल्याने जनतेमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

गृह कर्ज घेताय ; सार्वजनिक क्षेत्रातील ‘या’ बँंकेने केली कर्ज दरात कपात
आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.५४ रुपयांपर्यंत वाढला. दिल्लीत पेट्रोल १०३.५४ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.०१ रुपये इतका वाढला आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०४.२३ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११२.०७ रुपयांपर्यंत वाढला आहे. बंगळुरात पेट्रोल १०७.१४ रुपये झाले आहे.

सोने-चांदीमध्ये महागले ; जाणून घ्या आजचा सराफाचा भाव
आज मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९९.९२ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ९२.१२ रुपये आहे. चेन्नईत ९६.६० रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९५.२३ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव १०१.१७ रुपये असून बंगळुरात डिझेल ९७.७७ रुपये आहे.

बिटकॉइनमध्ये प्रचंड वाढ; ‘या’ कारणांमुळे बिटकॉइनसह इतर क्रिप्टो करन्सी महागले
जागतिक कमॉडिटी बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव मागील काही दिवस तेजीत आहे. गुरुवारी अमेरिकेत ब्रेंट क्रूडचा भाव ०.८७ डाॅलरने वधारून ८२७७ डाॅलर झाला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.८७ डाॅलरने वाढला आणि तो ७८.३० डाॅलर प्रती बॅरल झाला. रविवारी कंपन्यांनी पेट्रोलमध्ये २५ पैसे आणि डिझेलमध्ये ३० पैसे वाढ केली होती. सोमवारी इंधन दर स्थिर ठेवले होते. तर मंगळवारी पुन्हा दरवाढ करण्यात आली. बुधवारी आणि गुरुवारी कंपन्यांनी पेट्रोल ३० पैसे आणि डिझेल ३५ पैशांची वाढ केली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: