RBI ची मोठी घोषणा; डिजीटल व्यवहारांना दिले प्रोत्साहन, ‘IMPS’ बाबत घेतला हा निर्णय


हायलाइट्स:

  • गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आयएमपीएस (IMPS) सेवेबाबत मोठी घोषणा केली आहे.
  • आता ग्राहक एका दिवसात ५ लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकतील.
  • पूर्वी ही मर्यादा २ लाख रुपये होती.

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आयएमपीएस (IMPS) सेवेबाबत मोठी घोषणा केली आहे. आता ग्राहक एका दिवसात ५ लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकतील. पूर्वी ही मर्यादा २ लाख रुपये होती. भारतातील ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून पैसे कुठेही, कधीही पाठवले जाऊ शकतात, पण पैसे पाठवण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. ऑनलाइन बँकिंगमधून पैसे हस्तांतरित करण्याचे तीन मार्ग आहेत, ज्याद्वारे रक्कम हस्तांतरित केली जाते. यात आयएमपीएस (IMPS), एनईएफटी (NEFT) आणि आरटीजीएस (RTGS) चा समावेश आहे.

पेट्रोलियम कंपन्यांना अच्छे दिन! मुंबईत डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर, जाणून घ्या आजची दरवाढ
आयएमपीएस (IMPS) म्हणजे काय?
आयएमपीएस म्हणजे तत्काळ पेमेंट सेवा (Immediate Payment Service). सोप्या शब्दात आयएमपीएस द्वारे तुम्ही कोणत्याही खातेधारकाला कुठेही, कधीही पैसे पाठवू शकता. यामध्ये पैसे पाठवण्याच्या वेळेवर कोणतेही बंधन नाही. तुम्ही आयएमपीएसद्वारे काही सेकंदात, दिवसातील २४ तास, आठवड्याचे सात दिवस कधीही पैसे ट्रान्सफर करू शकता.

आरबीआयने आयएमपीएस (IMPS)चा कोणता नियम बदलला?
आरबीआयच्या नव्या निर्णयानंतर ग्राहक आयएमपीएसद्वारे ५ लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकतात. पूर्वी ही मर्यादा २ लाख रुपये होती. अनेक बँका आयएमपीएस (IMPS)वरून पैसे हस्तांतरित करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारत नाहीत.

भ्रमनिरास ! रिझर्व्ह बँकेची व्याजदर कपातीला हुलकावणी, पतधोरणात घेतला ‘हा’ निर्णय
आयएमपीएस (IMPS), एनईएफटी (NEFT) आणि आरटीजीएस (RTGS) सारख्या सुविधांसाठी इंटरनेट आवश्यक आहे. जर तुमच्याकडे संगणक किंवा लॅपटॉप नसेल, तर तुम्ही इंटरनेट सुविधा असलेल्या स्मार्टफोनवरूनही काम चालवू शकता.

जर तुम्ही स्मार्टफोन (मोबाईल बँकिंग) वापरत असाल, तर ज्या बँकेत तुमचे खाते आहे, त्या बँकेचे बँकिंग अॅप्लिकेशन डाउनलोड करा. ते सुरू करण्यासाठी तुम्हाला एम-पिन किंवा मोबाईल पिन तयार करणे आवश्यक आहे. तुम्ही या पिनच्या मदतीनेच अॅपवर लॉग-इन करू शकता. अॅपमध्ये निधी हस्तांतरणाचा पर्याय आहे.

गृह कर्ज घेताय ; सार्वजनिक क्षेत्रातील ‘या’ बँंकेने केली कर्ज दरात कपात
याद्वारे तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला पैसे ट्रान्सफर करू शकता, पण निधी हस्तांतरणासाठी तुम्हाला देयकाची (ज्यांना पैसे पाठवायचे आहेत) संपूर्ण माहिती द्यावी लागेल. संबंधित व्यक्तीचा खाते क्रमांक आणि त्या बँकेच्या शाखेचा आयएफएससी (IFSC) कोड, हे सर्व प्रविष्ट केल्यानंतर तुम्ही सहजपणे RTGS करू शकता. यात वेळापत्रक करून ठेवण्याची सुविधाही आहे. तुमच्या खात्यातून पैसे कधी हस्तांतरित करायचे हे तुम्ही ठरवू शकता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: