जपान: टोकियोमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के; ३० हून अधिक जखमी


टोकियो: जपानची राजधानी टोकियोमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. गुरुवारी रात्री आलेल्या या भूकंपामध्ये किमान ३० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. भूंकपाच्या धक्क्यानंतर नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. अनेकांनी मोकळ्या जागी धाव घेतली. भूकंपामुळे काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ग्रेटर टोकियोमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. तर, ‘क्योदो’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. भूकंपाची तीव्रता ५.९ रिश्टल स्केल इतकी मोजण्यात आली.

पाकिस्तानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के; २० ठार, १५० हून अधिक जखमी
भूकंपामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. भूकंपाचे केंद्र टोकियोच्या पूर्वेकडील चीबा प्रांतात असल्याचे वृत्त आहे.

दोन मजली इमारतीला विमान धडकले; एका मुलासह आठ जण ठार
सरकारी वृत्तवाहिनी एनएचके दिलेल्या वृत्तानुसार, भूकंपाच्या कारणामुळे शिनकानसेन सुपर एक्स्प्रेस ट्रेन काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती. काही ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली होती. जपान सरकारने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: