अर्थव्यवस्थेसाठी वाईट बातमी; या पतमानांकन संस्थेने ‘जीडीपी’चा अंदाज घटवला


हायलाइट्स:

  • फिच रेटिंग्सने ८.७ टक्के आर्थिक वृद्धी होईल, असा अंदाज वर्तवला आहे.
  • पुढील आर्थिक वर्षासाठी आर्थिक वृद्धीचा अंदाज १० टक्के केला आहे.
  • करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारताचे आर्थिक पुनरुज्जीवन रुळावरून घसरण्याऐवजी त्याला थोडा उशीर झाला,

नवी दिल्ली : फिच रेटिंग्सने चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक वृद्धीचा अंदाज घटवला आहे. त्याचीच सध्या चर्चा होत आहे. फिच रेटिंग्सने ८.७ टक्के आर्थिक वृद्धी होईल, असा अंदाज वर्तवला आहे. तसेच त्यांनी पुढील आर्थिक वर्षासाठी आर्थिक वृद्धीचा अंदाज १० टक्के केला आहे. रेटिंग एजन्सीने म्हटले आहे की, कोविड-१९ महामारीच्या दुसऱ्या लाटेने आर्थिक पुनरुज्जीवन विस्कळीत होण्यापासून वाचले असून फक्त त्याला विलंब झाला आहे.

भ्रमनिरास ! रिझर्व्ह बँकेची व्याजदर कपातीला हुलकावणी, पतधोरणात घेतला ‘हा’ निर्णय
फिच रेटिंग्सने त्यांच्या ‘एपीएसी सॉवरेन क्रेडिट ओव्हरव्ह्यू’ मध्ये म्हटले आहे की, ‘ नकारात्मक दृष्टिकोन, करोना महामारीमुळे बसलेल्या धक्क्यांमुळे भारताच्या सार्वजनिक वित्तक्षेत्रात तीव्र घट झाल्यानंतर कर्जाच्या मार्गावर अनिश्चितता दर्शवितो.

पेट्रोलियम कंपन्यांना अच्छे दिन! मुंबईत डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर, जाणून घ्या आजची दरवाढ
पूर्वी वर्तविला होता १० टक्के अंदाज
फिचने म्हटले आहे की, मार्च २०२२ मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) अंदाज कमी केला आहे. जूनमध्ये वर्तविलेल्या १० टक्के वाढीवरून तो ८.७ टक्क्यांवर आणला आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे असे करण्यात आले. त्यांनी जूनमध्ये आर्थिक वृद्धी वाढीचा अंदाज १२.८ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणला होता. आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या अंदाजाची तुलना मागील आर्थिक वर्षात नोंदविलेल्या ७.३ टक्के संकुचन आणि २०१९-२० मध्ये चार टक्क्यांच्या वाढीशी करण्यात आली आहे.

बिटकॉइनमध्ये प्रचंड वाढ; ‘या’ कारणांमुळे बिटकॉइनसह इतर क्रिप्टो करन्सी महागले
२०२२-२३ साठी विकासदराचा अंदाज वाढवला
रेटिंग कंपनी म्हणाली की, “करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारताचे आर्थिक पुनरुज्जीवन रुळावरून घसरण्याऐवजी त्याला थोडा उशीर झाला, असे आम्हाला वाटते. आम्ही जूनमध्ये २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ८.५ टक्के जीडीपी वाढीचा अंदाज १० टक्के केला आहे.

वित्तीय तूट ६.८ टक्के राहणे अपेक्षित
दरम्यान, फिचने वित्तीय तूट (फिस्कल डेफिसिट) वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. कंपनी म्हणाली की, “आम्ही २०२१-२२ या आर्थिक वर्षात केंद्र सरकारसाठी जीडीपीमध्ये (निर्गुंतवणुकीला वगळून) ७.२ टक्के तूट असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट ६.८ टक्के राहण्याचा अंदाज आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: