अतिउंचावरील प्रदेशाची चीनला ‘बाधा’?; लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे निधन


बीजिंग/नवी दिल्ली: चीनचे लष्करी अधिकारी झांग शुडाँग यांचे नुकतेच निधन झाले. चीनच्या लष्कराच्या पश्चिम थिएटर कमांडचे ते प्रमुख होते. भारताबरोबरील सीमा या कमांडच्या अखत्यारित येते. चीनने अद्याप वृत्तास अधिकृत दुजोरा दिलेला नाही. जनरल झांग यांना कर्करोगासह इतर आजार होते. भारताबरोबर लडाखमधील तणावाची स्थिती आणि अतिउंचावरील तैनातीची सवय नसल्याने चीनचे अनेक सैनिक आणि अधिकारी आजारी पडत असल्याचे वृत्त आहे.

चीनमध्ये २०१६मध्ये लष्करी यंत्रणेची पुनर्रचना झाली. त्यानुसार पाच थिएटर कमांडची निर्मिती करण्यात आली. त्यातील पश्चिम थिएटर कमांडची जबाबदारी भारताच्या सीमेवर देखरेख ठेवण्याची आहे. गेल्या वर्षापासून लडाखमध्ये उद्भवलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी लडाखमध्ये अतिउंचावर सैन्य आणले आहे. भारताला उंचावरील प्रदेशात कार्यरत राहण्याची सवय असली, तरी चीनला ती नाही. त्यामुळे गेल्या वर्षापासून उंचावरील या भागात तैनात असलेल्या चिनी लष्करामध्ये आजारांचे प्रमाण वाढले आहे.

अमेरिकेला धक्का; चीनजवळ आण्विक पाणबुडीचा रहस्यमय अपघात, ११ जखमी
कमी ऑक्सिजन, कमी तापमान, अतिउंचावरील प्रदेश यामुळे चीनच्या सैनिकांना त्रास होत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी नऊ महिन्यात या कमांडचे नेतृत्व तीनदा बदलले आहे. यावरूनच चीनला भेडसावणाऱ्या त्रासाची कल्पाना येईल, असे सूत्रांनी सांगितले.

India China: अरुणाचलच्या तवांग भागातही भारत – चिनी सैन्य आमने-सामने, LAC चा वाद
झांग यांची २३ डिसेंबर २०२० रोजी कमांडच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. गलवान खोऱ्यातील घटनेनंतर सहा महिन्यांनी केलेली ही नियुक्ती होती. या वर्षी जून महिन्यात झांग यांनी पदाचा राजीनामा दिला आणि सामरिक योजना समितीमध्ये त्यांना स्थान देण्यात आले. त्यांची जागा जनरल शू किलिंग यांनी घेतली. त्यांनीही दोनच महिन्यांत पद सोडले आणि त्यांची जागा वँग हैजियांग यांनी घेतली. जनरल शू यांनाही आतड्याचा त्रास असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: