नाशिकमधील ‘या’ तीन तालुक्यात पुन्हा रुग्णवाढ; पालकमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय


हायलाइट्स:

  • नाशिकमधील या तीन तालुक्यात पुन्हा रुग्णवाढ
  • पालकमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे आदेश
  • जिल्ह्यात ७५ टक्के लसीकरण पूर्ण

नाशिकः राज्यात करोना रुग्णांची संख्या आता आटोक्यात येत आहे. त्यामुळं करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे. तर, एकीकडे महाराष्ट्रातील अहमदनगर व पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. नाशिक जिल्ह्यातही सिन्नर, येवला या भागात रुग्ण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (Nashik Coronavirus cases)

नाशिकमधील इतर भागात रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी निफाड, येवला आणि सिन्नर या तीन तालुक्यात रुग्णसंख्या वाढतेय. त्यामुळं आज पालकमंत्री छगन भुजबळ यांबाबत कठोर पावलं उचलली आहेत. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यावर भाष्य करत एक महत्त्वाची सूचना दिली आहे.

वाचाः मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा स्वबळाचा नारा?; संजय राऊत म्हणतात…

नाशिकमध्ये करोना रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारीदेखील दिलासादायक आहे. मात्र, जिल्ह्यातील निफाड, येवला, सिन्नर या तीन तालुक्यात रुग्णसंख्या पुन्हा वाढतेय. त्यामुळं या तीन तालुक्यात रुग्ण आढळल्यानंतर त्याला यापुढे होम क्वारंटाईनला परवानगी न देता रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे, असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. तसंच, सरकार नागरिकांसाठी काम करतेय मात्र, प्रत्येक व्यक्तीने स्वतः कुटुंबाची काळजी घ्यायला हवी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

करोना नियमांचे बंधन अजून नागरिकांकडून पूर्णपण पाळले जात नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. जर परिस्थीती सुधार झाला नाही तर काही बाजारपेठा बंद कराव्या लागतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. मोठ्या मंदिरात, बाजारपेठेत लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचही त्यांनी म्हटलं आहे.

वाचाः मंडप सजून ठेवलाय, योग्य वेळी बँड लावून आम्ही..; ‘या’ नेत्याचे सूचक वक्तव्य

७५ टक्के लसीकरण पूर्ण

नाशिक जिल्ह्यात जवळपास ७५ टक्के लसीकरण पूर्ण झालं आहे. आत्तापर्यंत २८ लाख ५२ हजार जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर, १० लाख ६७ हजार जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्यात एकूण ३९ लाख २० हजार लसीकरण पूर्ण झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: