Coronavirus: एकाचवेळी पाच लाख रुग्णांना हाताळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज, केंद्राचा दावा


हायलाइट्स:

  • एकाच वेळी पाच लाख रुग्णांना हाताळण्याची भारताची क्षमता
  • रुग्णांच्या संख्येत घट, तयारीत मात्र कोणतीही कमतरता नाही
  • देशभरात ४००० पीएसए ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याचं काम सुरू

नवी दिल्ली : करोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार भारतावर कायम असतानाच केंद्र सरकारकडून एक मोठा दावा करण्यात आला आहे. एकाच दिवशी पाच लाख रुग्ण दाखल झाले तरी अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत सरकार सज्ज असल्याचं वक्तव्य नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी केलंय. ‘याचा अर्थ भविष्यात एवढ्या मोठ्या संख्येत करोना संक्रमणाचे रुग्ण दाखल होणार आहेत, असा घेऊ नका’ असंही त्यांनी स्पष्ट केलं.

करोना संक्रमणाशी दोन हात करण्यासाठी आरोग्यविषयक पाया मजबूत करण्यात आल्याचं व्ही के पॉल यांनी म्हटलंय. एका पत्रकार परिषदेत करोना संक्रमणासंबंधी भारत सरकारच्या तयारीची माहिती नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल देत होते.

देशात ४.८६ लाख ऑक्सिजन बेडस् उपलब्ध

ताज्या आकडेवारीनुसार, करोना संक्रमित रुग्णांसाठी देशभरात तब्बल ८.३६ लाख बेडस् उपलब्ध आहेत. याशिवाय अशा रुग्णांच्या देखरेखीसाठी केंद्रात जवळपास १० लाख (९,६९,८८५) क्वारंटाईन बेडस् तयार आहेत.

या व्यतिरिक्त देशभरात सध्या ४.८६ लाख ऑक्सिजन उपलब्ध असणारे बेडस् आणि १.३५ लाख आयसीयू बेडस् उपलब्ध आहेत, अशी माहिती पॉल यांनी दिली.

India China: अरुणाचलच्या तवांग भागातही भारत – चिनी सैन्य आमने-सामने, LAC चा वाद
pm modi : ‘मी स्वप्नातही विचार केला नव्हता…’, घटनात्मक पदावर २० वर्षे पूर्ण झाल्यावर बोलले PM मोदी

‘रुग्णांच्या संख्येत कमी, तयारीत कमतरता नाही’

देशात करोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी सरकारकडून तयारीमध्ये कोणतीही कमी ठेवण्यात आली नाही. दैनिक प्रकरणांना हाताळण्यासाठी ही यंत्रणा आणखीन मजबूत करण्यात आलीय. राज्य सरकारद्वारे करण्यात आलेलं हे काम उल्लेखनीय आहे. या कामात केंद्र सरकारच्या भागीदारीसोबतच खासगी क्षेत्राचाही हातभार लागल्याचा उल्लेखही व्ही के पॉल यांनी केला.

देशभरात १२०० ऑक्सिजन प्लान्ट कार्यरत

सध्या देशभरात १२०० पीएसए ऑक्सिजन प्लान्ट कार्यरत आहेत. देशात असा एकही जिल्हा नाही जिथे अशा प्रकारचं संयंत्र नाही. भविष्यात कोणत्याही संभ्याव्य ऑक्सिजन कमतरतेच्या संकटापासून दूर राहणयासाठी देशभरात जवळपास ४००० पीएसए ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याचं काम सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: