लंडन: लस मान्यतेवरून भारताशी सुरू असलेल्या वादामध्ये गुरुवारी अखेर ब्रिटनने माघार घेतली असून कोव्हिशील्ड लशीचा पात्रतेच्या यादीमध्ये समावेश केला अहे. त्यामुळे ११ ऑक्टोबरपासून ब्रिटनमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांना विलगीकरणामध्ये राहावे लागणार नाही. हा नियम कोव्हिशील्डच्या दोन लसमात्रा घेतलेल्यांनाच लागू करण्यात आला आहे. तसेच ११ ऑक्टोबरपूर्वी येणाऱ्या प्रवाशांना विलगीकरणात राहावेच लागेल.
कोव्हिशील्ड लशीला ब्रिटनने मान्यता दिली असतानाही लसधारकांना विलगीकरणाचा नियम लागू केल्याने भारताने नाराजी नोंदवली होती. त्यामुळे भारतानेही जशास तसे उत्तर देत सर्व ब्रिटिश नागरिकांना विमानतळावर दाखल होण्यापूर्वी ७२ तासांच्या आत तीन आरटी-पीसीआर चाचण्या कराव्या लागतील. त्यानंतर भारतात आल्यावर घरी किंवा मुक्कामाच्या ठिकाणी दहा दिवस विलगीकरणात राहावे लागेल, असे म्हटले होते. त्यामुळे हा वाद चिघळला होता.
भारताचेही जशास तसे; ब्रिटिश नागरिकांना १० दिवस विलगीकरण सक्तीचे
अखेर ब्रिटन नमले असून लसधारक भारतीयांसाठी नियमबदल केला आहे. आता कोव्हिशील्डच्या दोन लसमात्रा घेतलेल्यांचा मान्यतेमध्ये समावेश करण्यात आला असून पूर्ण लसीकरण झालेल्यांनुसार त्यांना वागणूक देण्यात येईल. फक्त ब्रिटनमध्ये येण्यापूर्वी १० दिवस या नागरिकांनी धोकादायक यादीत समाविष्ट असलेल्या देश किंवा प्रांतात प्रवास करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Source link
Like this:
Like Loading...