IPL Playoffs Scenarios: १७१ धावांनी विजय मिळवण्यासाठी काय करणार रोहित शर्मा; असा आहे…


शारजाह: कोलकाता नाईट रायडर्सने अखेरच्या साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सचा ८६ धावांनी पराभव करून प्ले ऑफमधील स्थान जवळ जवळ निश्चित केले आहे. गुणतक्यात दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू हे तिन संघ आहेत. चौथा संघ कोलकाताचा ठरणार हे देखील निश्चित आहे. कारण प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई इंडियन्सला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आजवर कोणत्याही संघाला करता न आलेली कामगिरी करावी लागणार आहे.

वाचा- Video : ‘BCCI मुळं सुरू आहे पाकिस्तान क्रिकेट, मोदींनी ठरवलं तर…’

कोलकाताचे १४ गुण आहेत. मुंबईने आज हैदराबादविरुद्ध विजय मिळवल्यास त्याचे १४ गुण होतील. पण गतविजेत्या मुंबई संघाचे नेट रनरेट केकेआरपेक्षा फार कमी आहे. केकेआरच्या रनरेटच्या पुढे जाण्यासाठी मुंबईला हैदराबादचा कमीत कमी १७१ धावांनी पराभव करावा लागले. अशा प्रकारचा विजय मिळवणे अशक्य नसले तरी अतिशय अवघड आहे.

मुंबईला प्लेऑफ मध्ये पोहोचण्यासाठी २०० पेक्षा अधिक धावा कराव्या लागतील आणि त्यानंतर १७१ धावांनी विजय मिळवावा लागले. या उटल जर मुंबई दुसऱ्यांचा फलंदाजी करणार असेल तर हैदराबादला कमीत कमी धावसंख्येत बाद करून विजयाचे लक्ष्य कमीत कमी चेंडूत पार करावे लागले.

वाचा- धोनी बनला दीपक चाहरचा ‘लव्ह गुरु’; गर्लफ्रेंडला प्रपोज करण्याचा बनवला प्लॅन

आयपीएलचे पाच विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला या वर्षी विजेतेपदाची हॅटट्रिक करण्याची संधी होती. पण भारतात झालेल्या पहिल्या सत्रात आणि युएईमध्ये झालेल्या दुसऱ्या सत्रात मुंबई इंडियन्सला चांगली कामगिरी करता आली नाही. त्याच बरोबर त्यांना नेट रनरेट देखील चांगले ठेवता आले नाही.

आजच्या लढतीत मुंबई इंडियन्स संघ मोठ्या विजयासाठी नक्कीच प्रयत्न करेल. यासाठी संघात बदल केला जाण्याची शक्यता आहे. फिरकीपटू जयंत यादवच्या जागी राहुल चाहरचा संघात समावेश केला जाऊ शकतो. मुंबई इंडियाच्या गोलंदाजांनी या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. अशीच कामगिरी फलंदाजांनी देखील केली तर मुंबई संघ मोठा विजय मिळवू शकतो.

असा आहे मुंबई इंडियन्सचा संभाव्य संघ

रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, जेम्स निशम, नॅथन कुल्टर नाईल, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्टSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: