चर्चा तर होणारच! मुख्यमंत्री गहलोत, सचिन पायलट यांचं एकत्र उड्डाण


हायलाइट्स:

  • राजस्थान काँग्रेसमध्ये सगळं काही आलबेल?
  • अजय माकन यांनी सोशल मीडियावर शेअर केला फोटो
  • अशोक गहलोत आणि सचिन पायलट निवडणूक रॅलीसाठी एकत्रच रवाना

जयपूर : पंजाब आणि छत्तीसगड काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या पक्षांतर्गत कुरघोडींमुळे पक्ष नेतृत्वाच्या अडचणींत वाढ झालेली दिसून आली. यानंतर, राजस्थानमध्ये मात्र काँग्रेस नेत्यांकडून एकजुटतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काँग्रेसचे महासचिव आणि राजस्थानचे प्रभारी अजय माकन यांची हा करिश्मा करून दाखवलाय, असं म्हणायला हरकत नाही.

काही दिवसांपूर्वीच ‘मी इथेच आहे… पुढची १५-२० वर्ष तरी मी कुठेही जाणार नाही. काही लोकांना ही गोष्ट कदाचित रुचणार नाही’, असं म्हणत मुख्यमंत्री गहलोत यांनी आपल्या विरोधकांना संदेश दिला होता. यानंतर अजय माकन यांनी नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या फोटोत एका हेलिकॉप्टरमध्ये बसून मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि त्यांचे पक्षातीलच विरोधक सचिन पायलट एकत्र दिसून येत आहेत. राजस्थानातील पक्षाचे हे दोन दिग्गज नेते एकत्र दिसल्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांतूनही मिळत्या-जुळत्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

Varun Gandhi: ‘वरुण गांधींना थोडाही स्वाभिमान शिल्लक असेल तर…’
navjot singh sidhu : सिद्धूंच्या १ हजार वाहनांच्या ताफ्याला यूपी पोलिसांनी लावला ब्रेक! सहारनपूरमध्ये घेतले ताब्यात
दोन जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या एका रॅलीसाठी रवाना होताना अशोक गहलोत आणि सचिन पायलट एकत्र दिसले. यावेळी अजय माकन हेदेखील हेलिकॉप्टरमध्ये हजर होते. त्यांच्यासमोर मुख्यमंत्री अशोक गहलोत बसलेले फोटोत दिसत आहेत.

तर दुसरीकडे, सचिन पायलट आणि राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा बसलेले दिसत आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोत माकन यांनी आपल्यासोबत तिन्ही नेत्यांनाही टॅग केलंय.

‘पोटनिवडणुकीसाठी रवाना होताना अशोक गहलोत, सचिन पायलट आणि गोविंद सिंह डोटासरा यांच्यासोबत’ असं माकन यांनी या फोटोसोबत म्हटलंय.

राज्यात पक्षात सगळं काही आलबेल असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न पक्षनेत्यांकडून केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

bjp national executive : राष्ट्रीय कार्यकारिणीत नेत्याचे नाव, पण नाचक्की होण्याची भाजपला भीती
priyanka gandhi : प्रियांका गांधी आक्रमक; म्हणाल्या, ‘PM मोदींना अजय मिश्रांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावीच लागेल’Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: