कोण म्हणतय अशक्य; पाहा टी-२० क्रिकेटमधील १७० पेक्षा अधिक धावांचे विजय


| महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Oct 8, 2021, 5:05 PM

Mumbai Indians: आयपीएलच्या १४व्या हंगामात गतविजेत्या मुंबई इंडियन्सला अखेरच्या साखळी सामन्यात अशी कामगिरी करावी लागणार आहे जी टी-२० क्रिकेटमध्ये मोजक्या संघांनी केली आहे.

 

नवी दिल्ली: आयपीएलच्या १४व्या हंगामातील अखेरच्या दोन साखळी लढती आज होणार आहेत. या दोन्ही लढती संध्याकाळी होणार असून त्यातील एक लढत गतविजेते मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील असेल. या लढतीच्या निकालावर मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाणार की नाही याचा फैसला होणार आहे.

काल गुरुवारी झालेल्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा ८६ धावांनी पराभव केला. यामुळे मुंबई इंडियन्स संघाला प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी फक्त विजय नाही तर चांगल्या रनरेटची गरज आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला हैदराबादविरुद्ध २०० हून अधिक धावा करत १७१ धावांनी विजय मिळवावा लागणार आहे.

टी-क्रिकेटमध्ये इतक्या मोठ्या धावांनी विजय मिळवणे हे अशक्य नसले तरी फार अवघड आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सची प्लेऑफमध्ये जाण्याची संधी हा सामना सुरू होण्याआधीच संपल्याची चर्चा सुरू आहे. पण खरच याआधी टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी कोणी केली नाही का? तर याचे उत्तर होय असे आहे. फक्त लीग टी-२० क्रिकेटमध्ये नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा मोठा विजय मिळवला गेलाय.

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांनी विजय मिळवण्याचा विक्रम चेक रिपब्लिकच्या नावावर आहे त्यांनी तुर्कीचा ३० ऑगस्ट २०१९ रोजी २५७ धावांनी पराभव केला होता. टी-२० मधील दुसरा मोठी विजय आंध्र प्रदेशच्या संघाच्या नावावर आहे. त्यांनी नागालँडवर १७९ धावांनी विजय मिळवाल होता. तर ऑगस्ट २०१९ मध्ये रोमानियाने तुर्कीचा १७३ धावांनी पराभव केला होता. वरील तिनही विजय हे लीग क्रिकेटमधील आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटचा विचार केल्यास. सर्वात मोठा विजय हा श्रीलंकेच्या नावावर आहे. त्यांनी १४ सप्टेंबर २०१९ रोजी केनियाविरुद्ध १७२ धावांनी विजय मिळवला होता. प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेने २६१ धावा केल्या होत्या. उत्तरा दाखल केनियाचा डाव ८८ धावांवर संपुष्टात आला.

आयपीएलमध्ये धावांचा विचार करता सर्वात मोठा विजय रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने मिळवाल आहे. त्यांनी १४ मे २०१६ रोजी गुजरात लायन्सचा १४४ धावांनी पराभव केला. आरसीबीने तेव्हा २४९ धावा केल्या होत्या. तर गुजरातला फक्त १०४ धावा करता आल्या. या सामन्यात विराटने १०९ तर एबी डिव्हिलियर्सने नाबाद १२९ धावा केल्या होत्या. भारतीय क्रिकेट संघाचा विचार केल्यास त्यांनी आयर्लंडवर २०१८ साली १४३ धावांनी विजय मिळवला होता. भारताने २१३ धावा केल्या होत्या. त्यानंतर आयर्लंडचा डाव ७० धावांत संपुष्टात आला.

आज मुंबई इंडियस समोर असाच मोठा विजय मिळवण्याचे आव्हान आहे. टी-२० क्रिकेटमध्ये काही मोजक्याच संघांनी असी कामगिरी केली असली तरी हे अशक्य देखील नाही. आता प्लेऑफमध्ये जाण्याचा दबाव घेऊन मुंबई इंडियन्स कशी कामगिरी करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: