क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे नाव भंडारदरा धरणाला देण्याच्या मागणीस रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई दि.08/10/2021 - अकोले तालुक्यात निसर्गरम्य भंडारदरा धरणाला विल्सन धरण असे नाव आहे. ते नाव बदलून क्रांतिकारक राघोजी भांगरे नामांतर करण्याची मागणी स्थनिक जनतेची आहे. या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असून त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविणार असल्याचे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिले.
अकोला संगमनेर शिर्डी दौऱ्यावर ना.रामदास आठवले आले असते राजूर येथे त्यांचे स्वागत माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी केले. यावेळी झालेल्या स्वागतपर सभेत ना.रामदास आठवले बोलत होते.
अकोला आदिवासी तालुका आहे.येथील आदिवासी व शेतकऱ्यांच्या जमिनी प्रत्येकाच्या नावावर आहेत.भंडारदरा परिसरात राज्य सरकार अभयारण्य उभारणार आहे. त्या नियोजित अभयारण्यात स्थानिक शेतकऱ्यांच्या जमीनी वनविभागाकडे वर्ग होतील. त्यामुळे अभयारण्य जरूर उभारा मात्र अभयारण्य शेत जमीनीवर उभारू नये तर डोंगर भागात अभयारण्य उभारावे अशी सूचना ना.रामदास आठवले यांनी केली असून त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आपण पाठपुरावा करू असे आश्वासन ना.रामदास आठवले यांनी दिले.
स्थानिक जनतेच्या वतीने यावेळी विविध मागण्यांचे निवेदन ना.रामदास आठवले यांना देण्यात आले.