खर्डीतील सीताराम महाराज मंदिर दर्शनासाठी खुले
खर्डीतील सीताराम महाराज मंदिर दर्शनासाठी खुले

खर्डी /अमोल कुलकर्णी,०७/१०/२०२१ – जिल्हा ग्रामीण तीर्थक्षेत्र असणारे खर्डी येथील श्री सीताराम महाराज मंदिर आज घटस्थापने दिवशी दर्शनासाठी खुले झाले.जागतिक महामारी कोरोना पार्श्वभूमीवर मंदिर दीड वर्ष दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. येथील मंदिरात दर गुरुवारी व अमावस्येला हजारो भाविक येत असतात.तसेच वार्षिक पुण्यतिथी भंडार्यासाठीही लाखो भाविक एकत्र येतात.

दिवसातून दोन वेळा पूजा,आरती,नैवेद्य,हरिपाठ असा नित्यक्रम असतो.आताही मंदिरात पूर्णपणे कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली पाळून दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी समाधी मंदिर ट्रस्ट योग्य व्यवस्थापन करीत आहे.यावेळी मुख्य विश्वस्त हरीभाऊ कुलकर्णी,हणमंत केसकर, हनुमान मंदिर पुजारी बाळासो मोकाशी,बापूसो केसकर,शिवाजी कांबळे,संतोष पाटील,राजू मोकाशी,उत्तम जाधव आदींसह भाविक उपस्थित होते.