भारतीय संघासाठी आनंदाची बातमी; ईशान किशनला फॉर्म गवसला, केले इतके विक्रम


अबुधाबी: गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाच्या काळजीचा विषय ठरलेल्या ईशान किशनने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. आयपीएलच्या १४व्या हंगामानंतर होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप संघात ईशानचा समावेश आहे. तो गेल्या काही दिवसापासून खराब फॉर्ममध्ये होता. त्यामुळे भारतीय संघाचे टेन्शन वाढले होते. पण गेल्या दोन डावात इशानने वादळी अर्धशतक झळकावले आणि फॉर्ममध्ये परतल्याचे सिद्ध केले.

वाचा- SRH vs MI Live : गतविजेते मुंबई इंडियन्स IPLमधून बाहेर पडले, प्लेऑफच्या आशा संपुष्टात

आज शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ईशानने ३२ चेंडूत ८४ धावा केल्या. त्याने १६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. ईशानने त्याच्या डावात ११ चौकार आणि ४ षटकार मारले. त्याने मुंबईला स्फोटक सुरूवात करुन दिली. त्यामुळे मुंबईने २० षटकात २३५ धावांचा डोंगर उभा केला. ईशानच्या या खेळीने आयपीएलमध्ये अनेक विक्रम देखील केले आहेत. जाणून घेऊयात त्याने केलेल्या विक्रमांबद्दल….

वाचा- ‘टीम इंडियाला हरवा अन् ब्लँक चेक घेऊन जा’; पाकिस्तान संघाला कुणी दिली ऑफर

१) मुंबई इंडियन्स संघाकडून करण्यात आलेले हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले आहे. याआधी कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या आणि ईशानने प्रत्येकी १७ चेंडूत अर्धशतक केले होते. पोलार्डने २०१६ मध्ये केकेआर आणि २०२१ मध्ये चेन्नईविरुद्ध, ईशानने केकेआरविरुद्ध २०१८ मध्ये तर हार्दिकने २०१९ मध्ये केकेआरविरुद्ध १७ चेंडूत ५० धावा केल्या होत्या.

वाचा-Video : ‘BCCI मुळं सुरू आहे पाकिस्तान क्रिकेट, मोदींनी ठरवलं तर…’

२) ईशानची अर्धशतकी खेळी ही आयपीएलच्या इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाची वेगवान खेळी ठरली. या यादीत केएल राहुल अव्वल स्थानी आहे. त्याने १४ चेंडूत ५० धावा केल्या आहेत. तर २०१४ मध्ये युसूफ पठणाने १५ चेंडूत अर्धशतक केले होते.

वाचा- Video: माहोल बना दिया! ईशान पेटला, फक्त १६ चेंडूत केले अर्धशतक

३) आयपीएलच्या १३ वर्षात पहिल्या चार षटकात अर्धशतक करण्याची कामगिरी फक्त दोन खेळाडूंनी केली आहे. पहिला फलंदाज राहुल असून त्याने २०१८ साली दिल्ली विरुद्ध २.५ षटकात ५० धावा केल्या होत्या. त्यानंतर गेल्या वर्षी चेन्नई विरुद्ध ४ षटक संपण्याआधी पुन्हा अशी कामगिरी केली होती. आता ईशानने अशी कामगिरी करुन दाखवली.

वाचा- कोण म्हणतय अशक्य; पाहा टी-२० क्रिकेटमधील १७० पेक्षा अधिक धावांचे विजय

४) पॉवर प्लेमध्ये ईशानने २२ चेंडूत ६३ धावा केल्या होत्या. आयपीएलच्या इतिहासातील ही तिसरी वेगवान खेळी आहे. याआधी २०१४ साली सुरेश रैनाने पॉवर प्लेमध्ये ८७ धावा केल्या होत्या. तर २००९ साली एडम गिलख्रिस्टने ७४ धावा केल्या होत्या. त्यानंतर आज ईशानने अशी वादळी खेळी केली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: