संतापजनक! प्रेयसीवर अत्याचार करू देण्यासाठी प्रियकर घ्यायचा ५०० रुपये


हायलाइट्स:

  • स्वत:च्या प्रेयसीबाबतच तरुणाने केलं धक्कादायक कृत्य
  • अत्याचार करू देण्याचे प्रियकर घेत होता ५०० रुपये
  • आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

नागपूर : स्वत:च्या प्रेयसीवर अत्याचार करू देण्याचे प्रियकर ५०० रुपये घेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी तरुणावर आणि त्याच्या साथीदारांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश भंडारी, संदीप पांढरे, अजय सुरणकर आणि फिरोज शेख अशी आरोपींची नावे आहेत.

ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आली. या प्रकरणातील पीडित युवती ही अल्पवयीन असून ती १६ वर्षांची आहे.

Aryan Khan in jail: आर्यन खान तुरुंगात बराक क्रमांक १ मध्ये; बाहेरचे अन्न घेता येणार नाही

पीडित मुलीची घरची परिस्थिती बेताची आहे. तिचे पालक हातमजुरी करून पोट भरतात. सर्वच आरोपीसुद्धा मजुरी करतात. आकाश आणि या मुलीचे प्रेमसंबंध असल्याचं सांगितलं जातं. या दोघांमध्ये शारीरिक संबंधसुद्धा होते असा आरोप करण्यात आला आहे. आकाश तिच्यावर बळजबरी करत असे. याखेरीज इतर आरोपी हे आकाशचे मित्र आहेत. तेसुद्धा तिच्यावर बळजबरी करत असत. आकाश स्वत: त्यांना ती करू देत असे आणि प्रत्येकाकडून पाचशे रुपये घेत असे असा धक्कादायक आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे.

अखेर या मुलीने तिच्या आईसोबत एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले व तक्रार दिली. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: