Video: माहोल बना दिया! ईशान पेटला, फक्त १६ चेंडूत केले अर्धशतक


अबुधाबी: आयपीएलच्या १४व्या हंगामातील अखेरच्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्स संघासमोर टी-२० क्रिकेटमधील सर्वात अवघड असा विजय साकारण्याचे आव्हान आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

वाचा- कोण म्हणतय अशक्य; पाहा टी-२० क्रिकेटमधील १७० पेक्षा अधिक धावांचे विजय

वाचा- IPL Playoffs Scenarios: १७१ धावांनी विजय मिळवण्यासाठी काय करणार रोहित शर्मा; असा आहे…

मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये जायचे असेल तर या सामन्यात १७१ धावांनी विजय मिळवण्याची गरज आहे. अशा अवघड विजयासाठी मुंबईने धमाकेदार सुरूवात केली आहे. पहिल्या षटकापासून मुंबईच्या सलामीवीरांनी षटाकर आणि चौकारांचा पाऊस पाडण्यास सुरूवात केली आहे. मुंबईचे सलामीवीर इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी पाच षटकात ७८ धावा केल्या. यात खराब फॉर्ममुळे चर्चेत आलेल्या ईशान किशनने फक्त १६ चेंडूत ५० धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून करण्यात आलेले हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे.

वाचा- Video : ‘BCCI मुळं सुरू आहे पाकिस्तान क्रिकेट, मोदींनी ठरवलं तर…’

मुंबई इंडियन्सने सहाव्या षटकात रोहित शर्माची विकेट गमावली. त्याने १८ धावा केल्या. पण दुसऱ्या बाजूला ईशान किशन स्फोटक फलंदाजी करत आहे.


ईशानच्या स्फोटक फलंदाजीमुळे मुंबईने ८व्या षटकात शतक पूर्ण केले. उमरान मलिकने १०व्या षटकातील पहिल्या चेंडूवर ईशानची विकेट घेतली. ईशानने ३२ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकारांसह ८४ धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट २६२.५० इतका होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: