आंतरधर्मीय संबंधाचं वावडं! मुलीचे प्रेमसंबंध नाकारत आई-वडिलांकडून तरुणाची हत्या


हायलाइट्स:

  • २८ सप्टेंबर रोजी आढळला तरुणाचा मृतदेह
  • पोलिसांना रेल्वे ट्रॅकवर आढळलेला मृतदेह
  • तरुणीच्या आई-वडिलांसहीत १० जणांना अटक

बंगळुरू : गेल्या महिन्यात २८ सप्टेंबर रोजी बेळगावच्या रेल्वे ट्रॅकवर एका २४ वर्षीय तरुणाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. या प्रकरणात १० जणांना अटक करण्यात आलीय. आंतरधर्मीय संबंध पसंत नसल्यानं तरुणीच्या आई-वडिलांकडून तरुणाची सुपारी देऊन हत्या घडवून आणण्यात आल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. मृत तरुणाचं नाव अरबाज आफताब मुल्ला असल्याचंही पोलीस चौकशीत समोर आलं.

प्रेयसीच्या आई-वडिलांना अटक

छिन्नविछिन्न अवस्थेत हा मृतदेह पोलिसांना रेल्वे ट्रॅकवर आढळला होता. पोलीस चौकशीत हे आत्महत्येचं प्रकरण नसून हत्या प्रकरण असल्याचे धागेदोरे समोर आले. अरबाज आफताब मुल्ला याच्या हत्या प्रकरणात त्याच्या प्रेयसीच्या आई-वडिलांसहीत १० जणांना अटक करण्यात आलीय.

आंतरधर्मीय संबंधाचं वावडं

मुस्लीम तरुणासोबतचे आपल्या मुलीचे प्रेमसंबंध आरोपी माता-पित्याला मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी अरबाजच्या हत्येची सुपारी दिल्याचं धक्कादायक सत्य पोलीस तपासात उघड झालंय.

पुंडलिका महाराज (३९ वर्ष), कुथाबद्धीन अल्लाहबख्श (३६ वर्ष), सुशीला ईरप्पा (४२ वर्ष), मारुती प्रल्हाद (३० वर्ष), मंजुनाथ तुकाराम (२५ वर्ष), गणपती ज्ञानेश्वर (२७ वर्ष), ईरप्पा बसवन्नी कुंभार (५४ वर्ष), प्रशांत कलप्पा (२८ वर्ष), प्रवीण शंकर (२८ वर्ष) आणि श्रीधर महादेव डोनी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.

Lakhimpur Violence: ‘मंत्रीपुत्र’ आशिष मिश्राच्या अटकेसंबंधी प्रश्नावर मुख्यमंत्री योगी म्हणतात…
लखीमपूर हिंसाचार: कारवाईत ढिसाळपणा, कोर्टानं यूपी सरकारला फटकारलं
असा झाला खुलासा

२७ सप्टेंबर रोजी अचानक बेपत्ता झालेल्या अरबाजचा मृतदेह खानापुरा भागाजवळ रेल्वे ट्रॅकवर आढळला होता. हिंदू मुलीसोबत प्रेमसंबंधात असल्यानं अरबाजची हत्या करण्यात आल्याचा संशय त्याची आई नजमा शेख यांनी व्यक्त केला होता. पोलीस तपासात अरबाजच्या प्रेयसीचे वडील ईरप्पा आणि आई सुशीला ईरप्पा यांनी अरबाजला मारण्याची सुपारी दिल्याचं स्पष्ट झालं. मुख्य आरोपी पुंडलिका यानं एक टीम तयार करून अरबाजची हत्या केली आणि त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर फेकून दिला.

बेळगावच्या आझम नगरचा रहिवासी असलेला अरबाज सिव्हिल इंजिनिअरिंगचा पदवीधर होता. बेळगावमध्ये तो कार डीलर म्हणून काम करत होता. २८ सप्टेंबर रोजी रेल्वे ट्रॅकवर अरबाजचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात अप्राकृतिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. शवविच्छेदन अहवालात डोक्यात सुरा घुपसल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांचा संशय खरा ठरला. त्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड विधान ३०२ (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील चौकशी सुरू केली. या प्रकरणात १० जणांना अटक करण्यात आलीय.

Gurmeet Ram Rahim: ‘डेरा’ सदस्य रणजीत सिंह हत्या प्रकरणात गुरमीत राम रहीम दोषी!
चर्चा तर होणारच! मुख्यमंत्री गहलोत, सचिन पायलट यांचं एकत्र उड्डाण



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: