UP Elections: यूपी निवडणुकीत योगींना दुसऱ्यांदा संधी मिळणार? काय म्हणतात नागरिक…लखनऊ : च्या रणधुमाळीला सुरूवात झालीय. निवडणूक जाहीर होण्यासाठी अवघे काही महिने उरले असताना ‘एबीपी न्यूज चॅनल’ आणि ”कडून संयुक्तपणे नागरिकांचा कल जाणून घेण्यासाठी नुकताच एक सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेत काही धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत.

उत्तर प्रदेशातील सर्व्हेचं गणित
पक्ष मतांची टक्केवारी
भाजप ४१ टक्के
समाजवादी पक्ष ३२ टक्के
बहुजन समाज पक्ष १५ टक्के
काँग्रेस ६ टक्के
इतर ६ टक्के

उत्तर प्रदेशात नागरिकांनी पुन्हा एकदा भाजपला पसंती दिली तरी पक्षाला जागांचं नुकसान होण्याची मोठी शक्यता आहे. सर्व्हेनुसार, २०१७ च्या तुलनेत २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला काही जागा गमवाव्या लागतील.

काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशावर जोर दिल्यानंतरही सर्व्हेत काँग्रेसला फारसा फायदा होताना दिसून येत नाही. पक्षाला केवळ ६ टक्के लोकांनी पसंती दिल्याचं सर्व्हेचा निष्कर्ष आहे.

कुणाला किती जागा मिळणार? (एकूण जागा : ४०३)
पक्ष विधानसभा जागा
भाजप २४१ – २४९ जागा
समाजवादी पक्ष १३० – १३८ जागा
बहुजन समाज पक्ष १५ – १९ जागा
काँग्रेस ३ – ७ जागा
इतर ० – ४ जागा

सर्व्हेच्या निष्कर्षानुसार, उत्तर प्रदेशात भाजपला पुन्हा एकदा सत्ता स्थापनेची संधी मिळू शकते. तसंच मुख्यमंत्री म्हणून सद्य मुख्यमंत्री यांची कामगिरी नागरिकांना समाधानकारक वाटतेय. जवळपास ४१ टक्के नागरिकांनी योगी आदित्यनाथ यांना आगामी निवडणुकीतही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पसंती दिलीय.

सपा प्रमुख यांना मुख्यमंत्रीपदी पाहण्याची इच्छा जवळपास ३१ टक्के लोकांनी व्यक्त केलीय. तर बसपा अध्यक्ष यांना १७ टक्के नागरिकांनी मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिलीय.

मुख्यमंत्री म्हणून नागरिकांची कुणाला पसंती?
योगी आदित्यनाथ ४१ टक्के
अखिलेश यादव ३१ टक्के
मायावती १७ टक्के
प्रियांका गांधी ४ टक्के
जयंत चौधरी २ टक्केSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: