धक्कादायक! मानसिक आजारी रुग्णाने कापले स्वत:चे लिंग


नैरोबी: स्किझोफ्रेनियाने आजारी असलेल्या एका ४८ वर्षीय व्यक्तीने आपले लिंग कापले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केनियामध्ये ही घटना घडली. मागील काही दिवसांपासून या व्यक्तीने औषधे घेणे बंद केली होते. कुटुंबीयांना या घटनेची माहिती बराच वेळेनंतर समजली. त्यांनी या रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. वैवाहिक जीवनातील लैंगिक समस्येने ग्रासल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असे म्हटले जाते.

‘डेली मेल’ने दिलेल्या वृत्तानुसार, या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी म्हटले की, घटना घडल्यानंतर जवळपास १६ तासांनी रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कुटुंबीयांनी या जखमी व्यक्तीचे कापलेले लिंग देखील रुग्णालयात आणले होते.

अफगाणिस्तान: मशिदीवरील आत्मघाती हल्ल्यात ४६ ठार; आयएसने घेतली जबाबदारी
ही घटना एका वैद्यकीय नियतकालिकेत प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये पीडित व्यक्तीची ओळख उघड करण्यात आली नाही. वृत्तानुसार, रुग्णालयात रुग्णाला दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी कापलेले लिंग पुन्हा जोडण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, कापलेला शरिराचा भाग हा योग्यप्रकारे न ठेवल्यामुळे आणि बराच वेळ झाल्यामुळे डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया टाळली.

पोटदुखीमुळे रुग्णालयात दाखल झाला; शस्त्रक्रियेने काढले एक किलो खिळे, नट बोल्ट!
डॉक्टरांनी या जखमी व्यक्तीचे लिंग जवळपास १६ तास उघड्यावर पडले होते. अशा परिस्थितीत हे लिंग शस्त्रक्रिया करून पुन्हा जोडले असते तर त्याला संसर्गाची बाधा झाली असती. शरिरातील इतर भागांमध्येही हा संसर्ग पोहचण्याचा धोका होता. त्याशिवाय, त्याचा मूत्राचा मार्गही कायमस्वरुपी निकामी झाला असता. त्यामुळे डॉक्टरांनी जोखीम न स्वीकारता लिंग जोडण्याची शस्त्रक्रिया टाळली.

नजोरोमधील एगर्टन विद्यापीठांच्या डॉक्टरांनी युरोलॉजी केस रिपोर्टमध्ये म्हटले की, संबंधित रुग्ण बराच वेळेपासून वेळेवर आपली औषधे घेत नव्हता. डॉक्टरांनी रुग्णाला संसर्गापासून वाचवण्यासाठी तातडीने उपचार सुरू केले.

वैद्यकीय नियतकालिकेत म्हटले की, अशा प्रकारच्या जखमा करून घेण्याच्या घटना दुर्मिळ असतात. अशी कृत्ये करणारे नागरिक साधारणपणे मानसिक त्रास, मतिभ्रम अथवा अमली पदार्थाच्या आहारी असतात. अशा प्रकरणात एखादी व्यक्ती आत्महत्या करण्याच्या विचारातून आपले लिंग कापण्याचे प्रयत्न करत असेल तर त्याला फॉलसीसाइड म्हणून ओळखले जाते. संसर्गाचा धोका कमी असल्यास डॉक्टर शस्त्रक्रिया करून पुन्हा एकदा लिंग जोडू शकतात.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: