विराट कोहली २०१९मध्येच का सोडणार होता कर्णधारपद, केला मोठा खुलासा…


IPL 2021 : नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने अलीकडेच भारतीय टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याबाबत घोषणा केली होती. त्यानंतर त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कर्णधारपदावरूनही पायउतार होण्याची घोषणाही केली होती. शेवटच्या श्वासापर्यंत आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळत राहीन, असंही यावेळी विराटने स्पष्ट केले होते. आयपीएलमध्ये पुढील वर्षीच्या हंगामापूर्वी मेगा लिलाव होणार आहे. अशा परिस्थितीत तो आरसीबीचा भाग असेल की, नवीन संघाचा भाग बनेल हे पाहावे लागेल. विराटचा आरसीबीमधील संघ सहकारी आणि जवळचा मित्र ए.बी. डिव्हिलियर्सशी त्याने आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याबाबत चर्चा केली होती. आता आयुष्यात शांतीपूर्ण वातावरणाची गरज असल्याचे त्याला वाटत होते, म्हणूनच त्याने आरसीबीच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता.

स्टार स्पोर्ट्सशी झालेल्या संभाषणात विराट कोहली म्हणाला की, मी २०१९ मध्ये ए.बी.शी या निर्णयाबद्दल बोललो होतो. आयपीएलमध्ये मला नेहमीच शांत वातावरणात राहायचे होते. याबद्दल आम्ही बोललो होतो, मला वाटले की आणखी एक वर्ष देऊया. त्यानंतर व्यवस्थापनात बदल झाले. २०२० मध्ये गोष्टी खूप चांगल्या झाल्या. त्यावेळी मला खूप आरामदायक वाटत होते. कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीने आयपीएल २०२० मध्ये प्लेऑफ गाठले होते, पण त्यापुढे ते जाऊ शकले नाहीत. आयपीएल २०२१ मध्ये संघाने चांगला खेळ दाखवला आहे. यावर्षीही आरसीबी तिसऱ्या स्थानी असून प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला आहे.

आरसीबी सलग दुसऱ्या वर्षी प्ले-ऑफमध्ये पोहोचली आहे. संघाला आशा आहे की यावेळी त्यांचा आयपीएल जिंकण्याचा दुष्काळ संपेल. आरसीबीचा संघ तीन वेळा अंतिम फेरीत गेला आहे, पण त्यांना जेतेपद पटकावता आले नाही.

डिव्हिलियर्सने केले कोहलीचे कौतुक
ए.बी. डिव्हिलियर्सने कोहलीच्या कर्णधारपदाची प्रशंसा केली. तो म्हणाला, ‘विराट कोहली एक अप्रतिम कर्णधार आहे. त्याच्या अंतर्गत खेळणे हा सन्मान आहे. मी त्याचा चाहता आहे, कारण गेल्या काही वर्षांमध्ये त्याने भारतीय संघ आणि आयपीएलमध्ये बराच दबाव सहन केला आहे. मला वाटते की, या वातावरणात तो थोडी मजा करू शकतो. आयपीएलमध्ये मित्रांसोबत टी-२० क्रिकेटमध्ये थोडी मजा करून नंतर सर्व फॉरमॅटमध्ये भारतासाठी पूर्ण दबावात खेळणे, याकडे कोहलीचं लक्ष लागलं आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: