एक्स्प्रेस ट्रेनमध्ये तरुणीवर बलात्कार, इगतपुरी-कसारा स्थानकांदरम्यान धक्कादायक घटना


हायलाइट्स:

  • एक्स्प्रेस ट्रेनमध्ये तरुणीवर बलात्कार
  • इगतपुरी-कसारा स्थानकांदरम्यान धक्कादायक घटना
  • लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेसमध्ये घडला भयंकर प्रकार

कल्याण : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत आहेत. आजही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेस ट्रेनमध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली. इगतपुरी ते कसारा स्थानकादरम्यान हा भयंकर प्रकार घडल्याची माहिती आहे.

या प्रकरणात लोहमार्ग पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील कारवाई सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेसमध्ये शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास दरोडेखोरांनी प्रवाश्यांना लुटलं. १५ त २० प्रवाशांची लूटमार केली. याच वेळी ट्रेनमध्ये असणार्‍या वीस वर्षांच्या तरुणीवर त्यांनी अत्याचार केले.

या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून दरोडेखोरांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे. या प्रकरणांमध्ये पोलिसांनी अद्याप दोन आरोपींना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

भाजपाच्या नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटीसा; बंडखोरांच्या खेळीने खळबळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इगतपुरी स्थानकातून ट्रेन निघाली आणि बोगद्याजवळ ट्रेन स्लो होते. यावेळी सात-आठ जण ट्रेनमध्ये चढले. या चोरट्यांनी १५ ते २० प्रवाशांना लुटले त्यांच्याकडून पैसे आणि मोबाइल हिसकावून घेतले. त्यांना बेदम मारहाण केली. अनेक प्रवासी यामध्ये जखमी झाले आहेत. या दरम्यान एका महिलेचीही चोरट्यांनी छेड काढली तर याच वेळी २० वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची माहिती पोलिसांनी सांगितलेली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून रेल्वेमध्ये ही अशा घटना घडल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *