शेवटी पायगुण लागतो; राणेंसमोरच शिवसेना नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक


हायलाइट्स:

  • चिपी विमानतळाचे आज लोकार्पण पार पडले
  • मुख्यमंत्री- नारायण राणे एकाच मंचावर
  • शिवसेना नेत्यांकडून राणेंवर निशाणा

सिंधुदुर्गः सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत लोकर्पण झाले. यावेळी शिवसेनेसह भाजप नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे व मुख्यमंत्री ठाकरे हे व्यासपीठावर एकत्र आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनीही मंचावर जोरदार फटकेबाजी केली.

चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई व केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे उपस्थित होते. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्याकडे कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा होती. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक करत राणेंना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.

खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढलं होतं; उद्धव ठाकरेंचा राणेंना टोला

सुभाष देसाई यांनी बोलताना महाराष्ट्राचे लाडके आणि देशातील एक नंबरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा त्यांचा उल्लेख केला आहे. अनेकांनी या विमानतळाच्या उद्घाटनाला उशीर झाल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र, शेवटी पायगुण लागतो म्हणतात. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचं उद्घाटन होत आहे, असं सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे.

LIVE पेढ्यातला गोडवा दाखवावा लागतो, मुख्यमंत्र्यांचा राणेंना खोचक टोला

खासदार विनायक राऊत यांनी सातत्याने पाठपुरावा केला. विमानतळासाठी लागण्याचा प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा ते करत राहिल्याचं देसाईंनी सांगितलं. चिपी विमानतळाचा द्रोणागिरी उचलण्यासाठी अनेकांचा हातभार लाभला. त्यात मी ही एक बोट लावलं. कोकणाच्या, आपल्या दृष्टीनं हा आनंदाचा सण आपण साजरा करत आहोत. आता कोकणवासियांची सर्व स्वप्न साकार होतील, असं देसाई यांनी म्हटलं आहे.

‘त्या’ तिघांना सोडण्यासाठी भाजपा नेत्यांचे फोन; समीर वानखेडेंनी उत्तर द्यावे’Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: