अजब नियमावली; महिलांनी पिझ्झा खाताना आणि पुरुषांनी चहा देण्याच्या दृष्यावर बंदी!तेहरान: अनेक जाहिराती, मालिका, चित्रपटांमध्ये महिलांना पिझ्झा खाताना पाहणे आणि पुरुषांनी महिलांना चहा देताना दिसणे ही सामान्य बाब आहे. मात्र, इराणमध्ये या दृष्यांवर बंदी घालण्यात आली आहे. इराणमधील वृत्तसंकेतस्थळ ‘इराणवायर’ने दिलेल्या वृत्तानुसार, महिलांना कोणत्याही लाल रंगाचे पेय, सँडविच, पिझ्झा खाताना दाखवता येणार नाही. त्याशिवाय, महिलांनी चमड्यांचे हातमोजे घालण्यावरही बंदी घातली आहे.

इस्लामिक रिपब्लिक ऑफ ब्रॉडकास्टिंगने (IRIB) नवीन सेन्सॉरशिप नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार आता ही बंधने लागू करण्यात आली आहेत. बंधने घातलेली अथवा साधर्म्य असणारी दृष्ये टीव्हीवर दाखवण्याआधी IRIB ची परवानगी घ्यावी लागणार आहे. IRIB चे जनसंपर्क अधिकारी आमिर हुसैन शमशादी यांनी सांगितले की, काही नियमांचा आढावा घेतल्यानंतर नवीन मार्गदर्शक तत्वे लागू करण्यात आली.

Pishgoo च्या शोमध्ये अभिनेत्रीचा चेहरा दाखवला नाही

सप्टेंबर महिन्यात इराणी टॉक शो Pishgoo मध्ये अभिनेत्री एल्नाज हबीबीचा चेहरा दाखवण्यात आला नव्हता. या शोच्या दरम्यान अभिनेत्री एल्नाज हबीबीचा आवाज ऐकू येत होता. त्यानंतर सेन्सॉरशिपच्या नवीन नियमाचा वापर सुरू झाला असल्याची चर्चा सुरू झाली होती.Source link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: