दानशूर नागरिकांनी मदतीसाठी पुढे यावे – तहसीलदार सचिन मुळीक यांचे आवाहन

सुभाष सातपुतेंकडून २ लाखाचे आरोग्य साहित्य प्रदान

आटपाडी,दि.६,(प्रतिनिधी)-पुण्याच्या भरारी ग्रुपचे संस्थापक, आटपाडी तालुक्यातील राजेवाडीचे युवा उद्योजक सुभाष सातपुते यांनी आज २ लाख रुपयापेक्षा अधिक किंमतीचे आरोग्य साहित्य प्रदान करून मानवतावादी सेवाभाव पुन्हा दाखवून दिला आहे .

 कोरोणा महामारीच्या पार्श्वभूमीवर आटपाडी तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्ण संख्या काळजी वाढविणारी आहे . तहसीलदार सचिन मुळीक यांनी केलेल्या विनंतीस अनुसरून में सुभाष सातपुते आणि कंपनी, पुणे यांचे प्रमुख सुभाष सातपुते यांनी तातडीने २ लाख २३ हजार रुपये किंमतीचे आरोग्य साहित्य आज आटपाडी तहसील कार्यालयात प्रदान करून मोठी मोलाची भूमिका बजावली . 

  तहसीलदार सचिन मुळीक,नायब तहसीलदार डॉ.राजकुमार राठोड,पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे ,ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.इम्रान तांबोळी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सौ . साधना पवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांच्या उपस्थितीत सुभाष सातपुते यांनी तहसीलदारांना आरोग्य साहित्य प्रदान केले.विविध प्रकारच्या औषधी गोळ्या, सॅनिटायझर,पीपीई किट, हॅन्डवॉश,ऑक्सीमीटर, टेम्प्रेचर गन इत्यादी आरोग्य साहित्याचा यात समावेश आहे .

    कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेवेळीही सुभाष सातपुते यांनी आटपाडी तालुक्यातील विविध गावासह पुण्यात शेकडो सर्वसामान्यांना जीवनाश्यक वस्तूंचे कीट प्रदान केले होते . गतवषी आटपाडी येथील असाह्य,अगतिक, गरीब, उपेक्षित वृद्ध दांम्पत्यांच्या घरावरील वादळी वार्‍याने पत्रे उडाल्यानंतर त्यांना तात्काळ रोख २५ हजार आणि महिनाभर पुरेल एवढे जीवनाश्यक वस्तूंचे कीट देवून सुभाष सातपुते यांनी चक्क त्या दांम्पत्याच्या लेकाची भुमिका बजावली होती . पनवेल तहसील कार्यालयात गत उन्हाळ्यात लाख रुपये किंमतीचा भेट दिलेला वॉटर कुलर सुभाष सातपुते यांच्या दातृत्वाची प्रचिती दाखवून गेला . बिघडलेला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पाणी तुमचे झाडे आमची हे अभियान हजारो झाडे वाढीस लावणारे, सर्वांना भावणारे ठरले. 
सुभाष सातपुतेंच्या दातृत्वाला शासकीय यंत्रणेकडून धन्यवाद
 सुभाष सातपुते यांच्या दातृत्वाला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धन्यवाद दिले . कोरोनाच्या वाढत्या संकटाला सामोरे जाण्यासाठी आणि रुग्णांना मदत व्हावी म्हणून दानशूर व्यक्ती ,सेवाभावी संस्था, संघटना, ट्रस्ट इत्यादींनी वस्तु रुपाने आरोग्याचे साहित्य शासनाला दान देवून तालुक्यावरील या अरिष्टात मानवतावादी भूमिकेने पुढे यावे, असे आवाहन तहसीलदार सचिन मुळीक यांनी करुन या कोरोना महामारीच्या संकटावर मात करण्या साठी नागरिक पुढे येतील असा आशावादही  तहसीलदार सचिन मुळीक यांनी व्यक्त केला . Danshur citizens should come forward for help - Tehsildar Sachin Muliks appeal

 यावेळी सुधीर विभुते, प्रविण कुचेकर,सचिन आटपाडकर, नजीर शेख हे उपस्थित होते.

दानशूर नागरिकांनी मदतीसाठी पुढे यावे – तहसीलदार सचिन मुळीक यांचे आवाहन Danshur citizens should come forward for help – Tehsildar Sachin Muliks appeal

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: