ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी विराट कोहलीने रणनिती आखली, इशान किशनला म्हणाला ही गोष्ट तुच करायची…


IPL 2021 : अबु धाबी : आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेल्या भारतीय संघात मुंबई इंडियन्स संघातील अनेक खेळाडूंचा समावेश आहे. त्यापैकीच एक ईशान किशन. आयपीएलच्या उत्तरार्धात त्याने उत्तम खेळ दाखवला आहे. हैदराबादविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात ईशानने तुफानी अर्धशतकी खेळी केली. या खेळीचं श्रेय त्याने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला दिलं आहे.
सामना संपल्यानंतर ईशान म्हणाला की, ‘विराट भाईंनी सलामीला खेळण्यासाठी तयार राहा, असे सांगितले होते. त्यांच्यासोबत माझी चांगली चर्चा झाली. जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या यांनीही खूप मदत केली. सर्वांनी मला पाठिंबा दिला आणि म्हणाले की, हा तुमच्यासाठी शिकण्याचा टप्पा आहे, तुम्ही आताच शिकून घ्या आणि आगामी विश्वचषक स्पर्धांमध्ये या चुका पुन्हा होणार नाहीत, याची काळजी घ्या. मला ओपनिंग करायला आवडेल. विराट भाई म्हणाले की, ‘सलामीवीर म्हणून तुझी निवड झाली आहे, तुला त्यासाठी तयार राहावे लागेल.’ मला असे वाटते की, मोठ्या स्पर्धांमध्ये कोणत्याही परिस्थितीसाठी तुम्ही तयार असणे आवश्यक आहे.’

युवा डावखुरा फलंदाज ईशान पुढे म्हणाला की, ‘धावा काढणे माझ्यासाठी आणि संघासाठीही चांगले आहे. विश्वचषकापूर्वी चांगल्या फॉर्मात असणे देखील महत्वाचे आहे. सध्या मी खूप सकारात्मक मनस्थितीमध्ये आहे.’

रोहितनं केलं ईशानचं कौतुक
सामन्यानंतर रोहित शर्माने किशनचे कौतुक केले. तो म्हणाला की, ‘तो खूप प्रतिभावान खेळाडू आहे. त्याने संघाच्या गरजेनुसार फलंदाजी केली.’ ईशान किशन आणि सूर्यकुमार यादवच्या झंझावाती खेळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईने हैदराबादचा ४२ धावांनी पराभव केला, पण ते प्ले-ऑफसाठी पात्र होऊ शकले नाही. मुंबईने दिलेल्या २३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ आठ बाद १९३ धावाच करू शकला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या ईशान किशनने ३२ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकारांसह ८४ धावा केल्या. त्याला सूर्यकुमार यादव ( ४० चेंडूत ८२ धावा)ने चांगली साथ दिली. या दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर मुंबईने मोठी धावसंख्या उभारली. इंडियन प्रीमियर लीगचा प्रवास मुंबई इंडियन्ससाठी संपुष्टात आला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामना जिंकूनही ते प्ले-ऑफसाठी पात्र होऊ शकले नाहीत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: