मुंबई इंडियन्सच्या अपयशानंतर रोहित शर्माने एकही शब्द न बोलता जिंकली सर्वांची मनं, व्हिडीओ झाला व्हायरल…


आबुधाबी : मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबाविरुद्धच्या सामन्यात २००पेक्षाही जास्त धावा केल्या, त्यांनी हा सामना जिंकला पण तरीही त्यांना प्ले-ऑफमध्ये पोहोचता आले नाही. या अपयशानंतर आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने मात्र एकही शब्द न बोलता आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रोहितचा हा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल होत आहेत. या एका व्हिडीओने रोहितने सर्वांची मनं जिंकली आहेत.रोहित शर्माचा हा व्हिडीओ सध्याच्या घडीला चाहत्यांमध्ये चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रोहितने आतापर्यंतच्या मुंबई इंडियन्सच्या कामगिरीचा आढावा घेतला आहे. त्याचबरोबर रोहितने म्हटले आहे की, ” आयपीएलच्या या मोसमामध्ये बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. पण गेल्या २-३ वर्षांमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने देदिप्यमान कामगिरी केली आहे. प्रत्येक खेळाडूला मुंबई इंडियन्सच्या जर्सीचा अभिमान आहे आणि त्यांनी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच आम्ही एक संघ होऊ शकलो, एक कुटुंब…”

हार्दिक पंड्याबाबत काय म्हणाला रोहित, पाहा…
“हार्दिकच्या गोलंदाजीबाबत बोलायचं झालं, तर त्याच्या गोलंदाजीवर फिजिओ आणि प्रशिक्षक काम करत आहेत. त्याने आतापर्यंत झालेल्या आयपीएलच्या सामन्यात एकही चेंडू टाकला नाही. आम्हाला एकावेळी एकच सामना लक्षात घेत त्याच्या फिटनेसचे आकलन करायचे होते. त्याच्या कामगिरीत दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. कदाचित पुढच्या आठवड्यापर्यंत तो गोलंदाजी सुरू करू शकेल. केवळ डॉक्टर आणि फिजिओच याबद्दल अधिक माहिती सांगू शकतात. जोपर्यंत त्याच्या फलंदाजीचा प्रश्न आहे, तो थोडा निराश असेल, पण तो एक चांगला खेळाडू आहे. तो भूतकाळातील कठीण परिस्थितीतूनही बाहेर आला आहे. संघाला त्याच्या क्षमतेवर विश्वास आहे. मलाही त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे,” असे रोहितने यावेळी सांगितले. आयपीएच्या या मोसमात हार्दिकने एकही षटक टाकले नाही आणि याचा मोठा फटका मुंबई इंडियन्सच्या ंसघाला बसल्याचे पाहायला मिळआले. त्याचबरोबर हार्दिकअजूनही पूर्णपणे फिट नसल्याचे म्हटले जात असून विश्वचषकात त्याचं काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: