Ashish Mishra Arrested लखीमपूर खेरी हिंसाचार: केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाला अखेर अटक


हायलाइट्स:

  • केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाला अखेर अटक
  • लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई.
  • बारा तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर घेतला अटकेचा निर्णय.

नवी दिल्ली: लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अखेर १२ तासांच्या चौकशीनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. तपासात सहकार्य करत नसल्याने व गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलिसांनी आशिष याच्यावर अटकेची कारवाई केली आहे. ( Union Ministers Son Ashish Mishra Arrested )

वाचा:लखीमपूर हत्याकांड: मुख्य आरोपी आशिष मिश्रा पोलिसांसमोर हजर

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी आशिष मिश्रा याच्यावर गंभीर आरोप आहेत. याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांकडून आज सकाळी ११ वाजल्यापासून मिश्रा याची चौकशी करण्यात येत होती. मात्र, चौकशीत सहकार्य करत नसल्याने पोलिसांनी १२ तासांनंतर पुढचे पाऊल उचलत आशिष मिश्रा याला अटक केली आहे. लखीमपूर खेरी प्रकरणी नेमण्यात आलेल्या समितीचे प्रमुख पोलीस महानिरीक्षक उपेंद्र अग्रवाल यांनी याबाबत माहिती दिली. ‘आरोपीची प्रदीर्घ काळ चौकशी करण्यात आली. त्यात आरोपी सहकार्य करायला तयार नाही. पोलिसांच्या काही प्रश्नांना आरोपी प्रतिसाद देत नसल्याने व दाखल गुन्हा गंभीर असल्याने अटक करण्यात आली आहे’, असे अग्रवाल यांनी सांगितले. आशिष याला उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

वाचा:आशिष मिश्राला अटक होण्याअगोदरच सिद्धूंचं उपोषण मागे

दरम्यान, लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात आशिष मिश्रा हा मुख्य आरोपी आहे. त्याच्यावर भारतीय दंड विधानाच्या कलम १४७, १४८, १४९ (दंगलीशी संबंधित कलमे), २७९ (बेदरकारपणे गाडी चालवणे), ३३८ (जीवाला धोका उत्पन्न होईल अशा पद्धतीने एखाद्याला इजा करणे), ३०४ अ, ३०२ (हत्या), आणि १२० ब ( गुन्हेगारी कट रचणे ) अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आशिष याच्या अटकेसाठी विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांचा मोठा दबाव होता.

लखीमपूर खेरीत नेमकं काय घडलं होतं?

लखीमपूर खेरीतील हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद देशभरात उमटत आहेत. येथे चार शेतकऱ्यांना जीपखाली चिरडण्यात आले होते. त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात आणखी चार जणांचा बळी गेला होता. उत्तर प्रदेश सरकारकडून सर्व मृतांच्या वारसांना ४५ लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली गेली आहे तर कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे.

वाचा:मविआची ११ ऑक्टोबरला बंदची हाक; ‘दोन्ही काँग्रेसह शिवसेना पूर्ण ताकदीने उतरणार’Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: