mumbai cruise drug case: एनसीबीने ड्रग पार्टी प्रकरणात सोडलेल्यांमध्ये एक राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या जवळचा; फडणवीसांचा गौप्यस्फोट
हायलाइट्स:
- देवेंद्र फडणवीस यांचा ड्रग पार्टी प्रकरणी गौप्यस्फोट
- ड्रग पार्टी प्रकरणी एनसीबीने अटक केलेल्यांपैकी काही लोकांना सोडले.
- सोडलेल्यांमध्ये राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याच्या मुलाच्या जवळचा
सोडून दिलेल्यांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या जवळचा माणूस
फडणवीस हे नागपूर येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. फडणवीस म्हणाले की, एनसीबीने क्रूझवर कारवाई करताना अनेक लोकांना पकडले. यातील जे लोक क्लीन होते त्यांना एनसीबीने सोडून दिले. मात्र ज्या लोकांकडे काही सापडलं होते, त्यांना मात्र एनसीबीने अटक केली. ड्रग्ज ही समाजाला लागलेली कीड आहे. अशा गोष्टीच्या विरोधात एखादी संस्था जर काम करत असेल तर त्या यंत्रणेच्या मागे उभे राहणे आवश्यक आहे. पण या प्रकरणात राजकारण केले जात असल्याचे दिसत आहे, असे म्हणत फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला.
क्लिक करा आणि वाचा- परतीच्या पावसाचा तडाखा; वीज कोसळल्याने एक शेतकरी ठार, तर दोन जखमी
हा गौप्यस्फोट करताना फडणवीस म्हणाले की, खरे म्हणजे ज्या लोकांना सोडण्यात आले, त्या लोकांमध्ये राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्याच्या मुलाचा एक अतिशय जवळचा माणूस होता. पण तो क्लीन होता, त्यामुळे मी त्याचे नाव घेत नाही. तो क्लीन असल्यामुळे त्याचे नाव घेऊन त्याला बदनाम करणे बरोबर नाही. मात्र, ते कुठल्या पक्षाचे होते की नाही हा मुद्दाच येत नाही.
क्लिक करा आणि वाचा- प्रशासनाचा मोठा निर्णय; बोगस डॉक्टरांकडे काम करणारेही होणार सहआरोपी
नवाब मलिकांवर केली टीका
या वेळी पत्रकारांनी फडणवीस यांना एनसीबीचे खच्चीकरण केले जात आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, नवाब मलिक यांचे दुखणे वेगळे आहे. त्याबाबात मी याआधीही बोललेलो आहे.
क्लिक करा आणि वाचा- ‘कोणी म्हणेल सिंधुदुर्ग किल्लाही मीच बांधला’; मुख्यमंत्री- राणेंचे ‘असे’ रंगले वाकयुद्ध