Nagpur Crime: नागपुरात मामानेच केली भाच्याची हत्या; ‘त्या’ संशयातून…


हायलाइट्स:

  • मामानेच केली भाच्याची निर्घृण हत्या.
  • नागपुरातील गड्डीगोदाममधील घटना.
  • आरोपीला काही तासांत केली अटक.

नागपूर: कौटुंबीक कलहातून मामाने भाच्याची निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना नागपूर येथील गड्डीगोदाम येथे शुक्रवारी मध्यरात्री घडली. सदर पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून मामाला अटक केली आहे. दिनेश लोखंडे (वय ४९),असे अटकेतील मारेकऱ्याचे तर अतुल उके (वय ४३) ,असे मृताचे नाव आहे. ( Nagpur Crime Latest Breaking News )

वाचा: क्रूझवरून कोणाला पकडलं, कोणाला सोडलं?; NCBने ‘तो’ आरोप फेटाळला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश व त्याच्या पत्नीमध्ये सतत वाद होतात. त्यामुळे त्याची पत्नी वेगळी राहते. अतुल यांच्या भावाचे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय दिनेशला आला. त्यामुळे दिनेश हा संतापला. शुक्रवारी रात्री त्याने अतुल यांना गाठले. दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातूनच लोखंडी रॉडने दिनेश याने त्यांच्या डोक्यावर वार केले. त्यात अतुल जखमी झाले व तिथून दिनेश पसार झाले.

वाचा: ‘त्या’ तिघांना सोडण्यासाठी भाजपा नेत्यांचे फोन; समीर वानखेडेंनी उत्तर द्यावे’

परिसरातील नागरिकांनी जखमी अतुल यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच सदर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी दिनेशला अटक केली आहे. त्याची तीन दिवस पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. दिनेश याच्याविरुद्ध जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे.

वाचा: लखीमपूर हिंसाचार: केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाला अखेर अटकSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: