Param Bir Singh: परमबीर सिंग यांना मुंबई पोलिसांची नोटीस; ‘ते’ घर बंद असल्याने…
हायलाइट्स:
- परमबीर सिंग यांच्या घरावर पोलिसांची नोटीस.
- चौकशीसाठी १२ ऑक्टोबरला हजर व्हावे लागणार.
- परमबीर यांचं मलबार हिल येथील घर होतं बंद.
वाचा: क्रूझवरून कोणाला पकडलं, कोणाला सोडलं?; NCBने ‘तो’ आरोप फेटाळला
परमबीर सिंग यांच्यासह सचिन वाझे तसेच इतर पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध मुंबईसह इतर ठिकाणी वेगवेगळे गुन्हे दाखल असून सीआयडी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच गुन्हे शाखा त्यांची चौकशी करीत आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. इतर यंत्रणांबरोबरच गुन्हे शाखेचे अधिकारी देखील परमबीर यांच्या शोधात आहेत. खंडणीच्या गुन्ह्यात प्रत्यक्ष चौकशी आवश्यक असल्याचे कारण देत गुन्हे शाखेने परमबीर यांना नोटीस धाडली आहे. ही नोटीस घेऊन पोलीस त्यांच्या मलबार हिल येथील घरी पोहोचले. मात्र, घर बंद असल्याने पोलिसांनी ही नोटीस त्यांच्या दरवाज्यावर चिकटवली आहे.
वाचा: ‘त्या’ तिघांना सोडण्यासाठी भाजपा नेत्यांचे फोन; समीर वानखेडेंनी उत्तर द्यावे’