Mumbai cruise drug case ड्रग्ज पार्टी: ‘भाजपचा कोणी दोषी असेल तर त्यालाही शिक्षा होईल, पण…’


हायलाइट्स:

  • नवाब मलिक मंत्रिपदाचे भान सोडून बोलताहेत.
  • भाजपाचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा टोला.
  • वकिली करायची हौस असेल तर न्यायालयात जा.

मुंबई: ‘ अल्पसंख्यांक कल्याणमंत्री नवाब मलिक यांनी मंत्रिपदाचे भान सोडून एनसीबीने अटक केलेल्या आरोपींची वकिली सुरू केल्याचे दिसते. तथापि, मीडिया ट्रायलमध्ये भारतीय जनता पार्टीवर टीका करून कोणी निर्दोष ठरणार नाही आणि सत्यही लपणार नाही. असत्याची कास धरून स्वतःला आरोपी करू नका’, असा टोला भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला. ( Mumbai Cruise Drug Case Update )

वाचा: क्रूझवरून कोणाला पकडलं, कोणाला सोडलं?; NCBने ‘तो’ आरोप फेटाळला

अंमलीपदार्थांच्या विरोधात कारवाई करणाऱ्या एनसीबीने एका जहाजावर छापा मारून काही जणांना पकडले. याबाबत राज्याचे अल्पसंख्यांक कल्याणमंत्री नवाब मलिक पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मीडिया ट्रायल चालवत आहेत आणि आरोपींना मदत होईल अशा रितीने तपासी यंत्रणेवर टीका करत आहेत. त्यामध्ये ते पुन्हा पुन्हा भारतीय जनता पार्टीलाही ओढत आहेत. पण अशा रितीने भाजपवर टीका करून आरोपींची सुटका होऊ शकत नाही. त्यासाठी न्यायालयानेच निकाल द्यावा लागतो, असे उपाध्ये म्हणाले. तपासी यंत्रणेला सातत्याने न्यायालयासमोर उभे रहावे लागत आहे. भाजपाचे कोणी दोषी असेल तर त्यालाही शिक्षा होईलच, असेही उपाध्ये म्हणाले.

वाचा: ‘त्या’ तिघांना सोडण्यासाठी भाजपा नेत्यांचे फोन; समीर वानखेडेंनी उत्तर द्यावे’

नवाब मलिक यांनी हे ध्यानात घ्यायला हवे की अटक केलेल्या आरोपींना एनसीबी कोठडीत ठेवायचे का, न्यायालयीन कोठडीत म्हणजे तुरुंगात पाठवायचे का किंवा जामीन द्यायचा याचा निवाडा न्यायालय करत आहे. त्या निमित्ताने तपासकामाची पडताळणी न्यायालयात होत आहे. नवाब मलिक यांना वकिली करायची हौस असेल तर न्यायालयात जावे आणि आपले म्हणणे मांडावे. पण ते प्रत्यक्ष न्यायालयात न जाता केवळ मीडिया ट्रायलमधून तपासकामाबद्दल संशय निर्माण करत आहेत. ते विनाकारण भारतीय जनता पार्टीला यामध्ये ओढत आहेत. असे करून त्यांच्या मनाचे समाधान होईल पण आरोपींची सुटका होणार नाही, असा निशाणाही उपाध्ये यांनी साधला.

वाचा:‘एनसीबीचं पुढचं टार्गेट अभिनेता शाहरूख खान’; ‘या’ मंत्र्यांचा सनसनाटी दावा

दरम्यान, क्रूझवरील छाप्यात एनसीबीने ८ नव्हे तर ११ जणांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी रिषभ सचदेव, प्रतीक गाबा आणि आमीर फर्निचरवाला या तिघांना त्याच रात्री एनसीबीच्या ताब्यातून सोडण्यात आले. नेमकं कोणाच्या सांगण्यावरून त्यांना सोडलं, असा सवाल मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. रिषभ सचदेव हा भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांचा मेव्हणा आहे तसेच तर प्रतीक गाबा आणि आमीर फर्निचरवाला यांच्या बोलावण्यावरूनच अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान या पार्टीला गेला होता, असा दावा नवाब मलिक यांना केला आहे. या तिघांना भाजपच्या नेत्यांचे फोन गेल्यानंतर सोडण्यात आले असा आरोपही मलिक यांनी केला आहे. त्याला उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले.

वाचा: आर्यन खानचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढणार; ‘हे’ आहे कारण…Source link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: