क्रांतीसुर्य संघटना दाळे गल्ली पंढरपूर यांच्यावतीने महात्मा फुले जयंती साजरी
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – क्रांतीसुर्य संघटना दाळे गल्ली पंढरपूर यांच्यावतीने महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली. दाळे गल्ली येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन समस्त माळी समाज युवक संघटना ,क्रांतीसुर्य फाउंडेशन व सत्यशोधक प्रतिष्ठान,पंढरपूर यांच्यावतीने सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे क्रांतीसुर्य युवा संघटना दाळे गल्ली चे अध्यक्ष गणेश म्हेत्रे व सर्व पदाधिकारी आभार मानताना अशाच प्रकारे सर्वांची पाठीवर शाबासकीची थाप राहावी आणि आमच्या संघटनेच्यावतीने सामाजिक उपक्रमासाठी आपल्या शुभेच्छा राहाव्यात अशी इच्छा व्यक्त केली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विराट कोळी,माऊली मासाळ, समर्थ कावळे,मल्हार म्हेत्रे,आरव पिंपळे,गुरू गाढवे,रुद्र राऊत यांनी प्रयत्न केले.
जयंतीनिमित्त सजीव देखावा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावर आधारित होता.हा सुंदर असा देखावा विठ्ठल म्हेत्रे व आयुष्य करजगी यांनी सादर केला होता.