नवी दिल्लीः राजधानी
दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात (
delhi police on high alert ) आला आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत
दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. गुप्तचर संस्थेकडून मिळालेल्या माहितीनंतर दिल्लीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी बाजारपेठांमध्ये सुरक्षा वाढवली आहे. हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसवर लक्ष ठेवले जात आहे. भाडेकरूंच्या पडताळणीवरही भर दिला जात आहे.
आगामी सणासुदीच्या काळात कोणत्याही अप्रिय घटनेला सामोरे जाण्यासाठी दिल्ली पोलिसांनी राजधानी दिल्लीच्या अनेक भागांमध्ये गस्त वाढवली आहे. नवरात्रोत्सवाने सणासुदीला सुरवात आहे. आणि गुरुवारपासून सुरवात सणांना सुरवात झाली आहे. यावेळी स्थानिक बाजारपेठ आणि मंदिरांमध्ये गर्दी कमी आहे. सणांमुळे दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
नागरिकांच्या प्रचंड गर्दीमुळे नेहमीच काही अनुचित घटना घडण्याची शक्यता असते. पोलिसांना गस्त घालताना पाहिल्यावर आम्हाला सुरक्षित वाटतं, असं उत्तर-पश्चिम दिल्लीतील एका स्थानिक दुकानदाराने सांगितलं.
हवाई दलाच्या तीन तुकड्यांचा गौरव
दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने १४ सप्टेंबरला पाकिस्तानातील दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. सणासुदीच्या काळात देशात दहशतवादी हल्ल्यांची योजना आखणाऱ्या सात संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती. आरोपींची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
काश्मीर खोऱ्यामध्ये नागरिक संतप्त
Source link
Like this:
Like Loading...