mayawati asks congress high command : ‘दलिताची हत्या झाली, राहुल – प्रियांका हनुमानगढला कधी जाणार? ५० लाखांची मदत देणार का?’ मायावतींचा बोचरा सवाल
राजस्थानच्या हनुमानगढ जिल्ह्यात एका दलित तरुणाला बेदम मारहारण करण्यात आली. मारहाणीत त्याची निर्घृण हत्या केली गेली. ही अतिशय दुःखद आणि निषेधार्ह घटना आहे. पण काँग्रेस हायकमांड गप्प का आहे? काँग्रेसचे छत्तीसगड आणि पंजाबचे मुख्यमंत्री पीडित कुटुंबाची भेट घेऊन ५०-५० लाख रुपयांची मदत देणार का? याचं उत्तर द्यावं. काँग्रेसने मदत जाहीर न केल्या दलितांच्या नावाने नक्राश्रू ढाळणं बंद करावं, असं म्हणत मायावती बरसल्या आहेत.
भाजपच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित
मायावती यांनी आणखी एक ट्विट करत उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी घटनेचा उल्लेख केला. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलगा लखीमपूर खिरी प्रकरणी वादात सापडला आहे. यामुळे भाजप सरकारच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीव भाजपने स्वतःहून आपल्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा. तरच पीडित शेतकऱ्यांना थोडाफार न्याय मिळू शकेल, असं मायावती म्हणाल्या.
dalit man beaten to death : बेदम मारहाण करत एका दलित तरुणाची क्रूर हत्या, व्हिडिओ व्हायरल
‘केंद्राने कठोर पावलं उचलावीत’
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी अलिकडेच काही नागरिकांच्या हत्या केल्या. यावरून मायावतींनी केंद्र सरकरला आवाहन केलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत सामान्य आणि निष्पाप नागरिकांच्या हत्या दहशतवाद्यांनी केल्या. हे अतिशय दुःखद आहे. केंद्र सरकारने दहशतवाद्यांविरोधात कठोर पावलं उचलावीत, असं मायावती म्हणाल्या.
मैत्रिणीवरून दोन विद्यार्थी एकमेकांना भिडले; विद्यापीठात गोळीबार, एकाचा मृत्यू