priyanka gandhi vadra : प्रियांका गांधींचे बम बम भोले! PM मोदींच्या मतदारसंघात फोडला प्रचाराचा नारळ; म्हणाल्या…
‘दलिताची हत्या, राहुल – प्रियांका हनुमानगढला कधी जाणार?’ मायावती बरसल्या
वाराणसीतील ‘किसान न्याय रॅली’मध्ये काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. देशाच्या गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाने ६ शेतकऱ्यांना त्यांची निर्घृणपणे कारखाली चिरडून हत्या केली. आम्हाला न्याय हवाय, नुकसान भरपाई नको, असं आता सर्व पीडित कुटुंब म्हणत आहेत. पण आपल्याला न्याय देणारा या सरकारमध्ये दिसत नाहीए. ज्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडलेल्या त्या गृह राज्यमंत्र्याचा बचाव राज्याचे मुख्यमंत्री करत आहेत. पंतप्रधान लखनऊला येऊ शकतात. मग ते शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी दोन तासांच्या अंतरावर असलेल्या लखीमपूरला का गेले नाहीत?, असा सावल प्रियांका गांधींनी उपस्थित केला.
लखीमपूर खिरी हिंसाचार; आरोपी मंत्रिपुत्राची न्यायालयीन कोठडीत रवानगी
प्रियांका गांधींचे बम बम भोले! PM मोदींच्या मतदारसंघात फोडला प्रचाराचा नारळ; म्हणाल्या…