ICCने केली मोठी घोषणा; या संघाला मिळणार १२ कोटी रुपये


दुबई: येत्या १७ ऑक्टोबरपासून आयसीसी टी-२० वर्ल्डकपला सुरूवात होणार आहे. ही स्पर्धा करोनामुळे भारता ऐवजी युएई आणि ओमान येथे होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या स्पर्धेतील बक्षिसाची रक्कम जाहीर केली आहे. विजेत्या संघाला १.६ मिलियन डॉलर म्हणजे जवळ जवळ १२ कोटी रुपये तर उपविजेत्या संघाला ८ लाख डॉलर म्हणजेच ६ कोटी रुपये दिले जाणार आहेत. तर सेमीफायनलमध्ये पराभूत होणाऱ्या दोन संघांना प्रत्येकी ४ लाख डॉलर म्हणजेच ३ कोटी रुपये दिले जातील.

टी-२० वर्ल्डकपमध्ये एकूण ५.६ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास ४२ कोटी रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. त्यानंतर सुपर १२ स्टेजमध्ये प्रत्येक विजयानंतर बोनस पुरस्कार दिला जाईल. हीच पद्धत २०१६च्या स्पर्धेत करण्यात आली होती. सुपर १२ स्टेजमध्ये एकूण ३० सामन्यात ४० हजार डॉलर म्हणजे १ कोटी २० लाख इतकी रक्कम पुरस्कार म्हणून दिली जाणार आहे. सुपर १२ स्टेजमधून बाहेर होणाऱ्या प्रत्येक संघाला ७० हजार डॉलर मिळतील.

पात्रता फेरीत बांगलादेश, आयर्लंड, नामीबिया, नेदरलँड, ओमान, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलँड आणि श्रीलंका हे संघ खेळतील. तर ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज या संघांनी आधीच सुपर १२ स्टेजमध्ये प्रवेश केला आहे. ग्रुप बी मध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपारीक प्रतिस्पर्धी आहे. या दोन्ही संघात २४ ऑक्टोबर रोजी लढत होणार आहे. गेल्या काही वर्षात भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय लढत होत नसल्याने या सामन्यावर सर्व चाहत्यांची नजर असेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: