Delhi vs Chennai Qualifier 1 Live Cricket Score: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, क्वॉलिफायर १ चे लाईव्ह अपडेट


दुबई: आयपीएलच्या १४व्या हंगामातील पहिल्या क्वॉलिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लढत होणार आहे. या लढतीत जो संघ विजयी होईल त्याला फायनलचे तिकिट मिळेल तर पराभूत होणाऱ्या संघाला फायनलमध्ये जाण्याची आणखी एक संधी मिळेल. या लढतीचे लाईव्ह अपडेट महाराष्ट्र टाईम्स सोबत जाणून घ्या…

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, क्वॉलिफायर १ अपडेट (Delhi vs Chennai Qualifier 1 Live)

>> पृथ्वीचे २७ चेंडूत अर्धशतक

>> श्रेयस अय्यर १ धाव करून माघारी परतला, दिल्ली २ बाद ५०

>> दिल्ली कॅपिटल्सला पहिला धक्का, शिखर धवन ५ धावांवर बाद- जोश हेजलवूडने घेतली विकेट

>> ३ षटकात दिल्लीच्या ३२ धावा, पृथ्वीच्या १३ चेंडूत २९ धावा

>>दिल्ली कॅपिटल्सच्या डावाला सुरूवात- पृथ्वी शॉ आणि शिखर धवन मैदानात, चेन्नईकडून दीपक चाहर पहिली ओव्हर टाकणार

>> दिल्ली कॅपिटल्स संघात एक बदल- रिपल पटेलच्या जागी टॉम करनला संधी

>> चेन्नई संघात कोणताही बदल नाही

>>चेन्नई सुपर किंग्जने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

>> २०१३ साली राहुल द्रविडनंतर वय वर्ष ४० नंतर प्लेऑफमध्ये खेळणार धोनी हा दुसरा खेळाडू ठरलाय

>> आयपीएलच्या क्वॉलिफायरमध्ये संघाचे नेतृत्व करणारा ऋषभ पंत हा सर्वात तरुण कर्णधार ठरला आहे

>> वाचा- दिल्लीविरुद्धच्या लढतीच्याआधी धोनीच्या संघाला बसू शकतो मोठा धक्का; पहिल्या क्वॉलिफायरचे अपडेट



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: