केंद्र सरकारचा विक्रीचा धडका; एअर इंडिया विकली आता ‘या’ कंपनीची होणार विक्री


हायलाइट्स:

  • केंद्र सरकारने इतर सरकारी कंपन्या आणि महामंडळे यांची विक्री करण्यासाठी कंबर कसली आहे.
  • एअर इंडिया समूहातील अलायन्स एअर या सरकारी कंपनीची देखील लवकरच विक्री केली जाणार आहे.
  • केंद्र सरकारला कर्जात बुडालेल्या एअर इंडियाची विक्री करण्यात यश मिळाले.

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या लिलावानंतर आता केंद्र सरकारने इतर सरकारी कंपन्या आणि महामंडळे यांची विक्री करण्यासाठी कंबर कसली आहे. एअर इंडिया समूहातील अलायन्स एअर या सरकारी कंपनीची देखील लवकरच विक्री केली जाणार आहे.

सणासुदीत खाद्यतेल महागले; भाववाढ रोखण्यासाठी सरकारने उचलले हे पाऊल
नुकताच सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उदघाट्न झाले. या विमानतळाला अलायन्स एअर या कंपनीची सेवा सुरु आहे. मात्र याच सरकारी कंपनीची देखील एअर इंडियाप्रमाणे विक्री करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारच्या तोट्यातील मालमत्ता आणि सार्वजनिक उपक्रमांच्या विक्रीअंतर्गत अलायन्स एअर देखील विक्री केली जाणार आहे.

सणासुदीत सोने महागले ; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव
अलायन्स एअर ही एअर इंडियाची उपकंपनी आहे. अलायन्स एअरकडे १९ एटीआर विमाने असून ४८ ठिकाणी सध्या कंपनीची विमान सेवा सुरु आहे. २०२० या आर्थिक वर्षात अलायन्स एअरला २०१ कोटींचा तोटा झाला होता. तर ६५.०९ कोटींचा परिचालन नफा झाला होता. केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत सेवेसाठी ही कंपनी चांगले योगदान देत आहे.

नियमित वेतन नसणाऱ्यांनाही मिळेल कर्ज; श्रीराम हाऊसिंग फायनान्सने आणली ‘ही’ योजना
नुकताच सरकारने अलायन्स एअरची श्रीलंकेसाठी सेवा सुरु केली होती. तसेच पूर्वोत्तर आणि ईशान्य भारतात तोट्यातील मार्गांवर देखील ही कंपनी विमान सेवा देत आहे. अलायन्स एअरची स्थावर मालमत्ता जसे की कार्यालय इमारत आणि इतर मालमत्ताची विक्री करून किमान १४७०० कोटी सरकारला मिळू शकतात. तसेच कंपनीचा ग्राउंड हँडलिंग विभाग आणि अभियांत्रिकी विभागाची विक्री करून किमान २००० कोटीचा महसूल मिळू शकतो, असे या प्रस्तावाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं आहे.Source link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: