टॉस जिंकला आणि तेथेच धोनीने फायनलचे तिकिट मिळवले? जाणून घ्या गणित


दुबई: आयपीएलच्या १४व्या हंगामातील पहिली क्वॉलिफायर दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू आहे. चेन्नईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉ आणि कर्णधार ऋषभ पंत यांच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने २० षटकात १७२ धावा केल्या.

वाचा- मुंबई इंडियन्स घेणार मोठा निर्णय; या खेळाडूंना मिळणार डच्चू!

आयपीएलमध्ये नवव्यांदा फायनलमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जला १७३ धावांची गरज आहे. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार धोनीने टॉस जिंकून ५० टक्के लढत जिंकल्याचे मानले जात आहे. कारण आयपीएलच्या या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने दुसऱ्यांचा फलंदाजी करत एकही लढत गमावलेली नाही. त्यांनी धावांचा पाठलाग करताना पाच विजय मिळवले आहेत. या शिवाय दुबई मैदानावर गेल्या सात लढतीत दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. या दोन गोष्टी चेन्नईच्या बाजूने असल्याने त्यांचे फायनलचे तिकीट पक्के असल्याचे मानले जात आहे.

वाचा- BCCIने टी-२० वर्ल्डकप संघात बदल केला का? जाणून घ्या मोठी अपडेट

चेन्नईविरुद्धच्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने एक अनोखा विक्रम स्वत:च्या नावावर केला. आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी वयात प्लेऑफमध्ये संघाचे नेतृत्व करण्याचा मान पंतला मिळाला आहे. त्याने २४ वर्ष आणि सहाव्या दिवशी प्लेऑफमध्ये संघाचे नेतृत्व केल. तर चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा देखील प्लेऑफमध्ये संघाचे नेतृत्व करणारा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला आहे. याआधी राहुल द्रविडने २०१३ साली अशी कामगिरी केली होती.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: