महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा

पंढरपूर – लखीमपुर शेतकरी आंदोलन हल्ल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या उद्याच्या बंदला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे. या बंदकडे राजकीय चष्म्यातून न पाहता घडलेल्या घटनेची तीव्रता पहायला हवी. या घटनेच्या माध्यमातुन मोदी सरकारचा शेतकर्‍यांना संपवण्याचा व कृषीक्षेत्र नष्ट करण्याचा डाव सर्वांसमोर आलेला आहे.

   लखीमपुर खेरी मध्ये घडलेली घटना ही मोदी सरकारच्या क्रुरपणाचा कळस आहे.याबाबत सर्वांनीच एकत्रित येत लढणे गरजेचे आहे.या घटनेबाबत केंद्र सरकारला रस्त्यावर उतरून जाब विचारणे गरजेचे आहे कारण हा हल्ला म्हणजे देशातील तमाम शेतकर्‍यांच्या अस्मितेवर घातलेला घाला आहे.म्हणुनच शेतकरी प्रश्नांबाबत कोणीही लढाईची भुमिका घेतली असेल तर पक्ष व विचारधारा विसरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांच्या नेतृत्वात या बंदला पाठिंबा देत आहे. या लढ्यासंदर्भात जे जे आवाज उठवतील स्वाभिमानी शेतकरी संघटना नक्कीच त्यांच्यासोबत लढाईत असेल असे स्वाभिमानी शेतकरी संघटना,युवा आघाडीचे राज्य प्रवक्ता रणजित बागल यांनी सांगितले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: