शारीरिक सुखाला नकार देणाऱ्या पत्नीची कुर्‍हाडीने वार करून हत्या


हायलाइट्स:

  • कुर्‍हाडीने वार करून पत्नीचा खून
  • शारीरिक सुखाला नकार दिल्याने नराधम पतीचं कृत्य
  • यवतमाळमधील घटनेनं सर्वत्र खळबळ

यवतमाळ : घरगुती कारणातून उद्भवलेल्या वादात कुर्‍हाडीने वार करून पत्नीचा खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना घाटंजी तालुक्यातील पंगडी येथे रविवार, १० ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. दीक्षा संतोष ठाकरे (३०), रा. पंगडी असं मृत महिलेचं नाव आहे, तर संतोष ठाकरे (३५) रा. पंगडी असं संशयित आरोपी पतीचं नाव आहे.

संतोषने शनिवारी रात्री पत्नीकडे शारीरिक सुखाची मागणी केली. मात्र, महिलेने नकार दिला. सकाळी पुन्हा पतीने पुन्हा तीच मागणी करत वाद घातला. राग अनावर झाल्याने नराधमाने पत्नीच्या मानेवर, डोक्यावर कुर्‍हाडीने घाव घातले. यात तिचा जागीच मृत्यू झाला.

१९ वर्षीय तरुणीने केली आत्महत्या; सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा

या घटनेची माहिती आरोपी पतीकडूनच घाटंजी पोलिसांना देण्यात आली. शारीरिक संबंधास नकार दिल्याने पत्नीचा खून केल्याची कबुली पती संतोष ठाकरे याने पोलिसांत दिली. त्यांना सात वर्षांची मुलगी व पाच वर्षांचा मुलगा आहे.

दरम्यान, घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी भेट दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. पत्नीच्या खुनाप्रकरणी संतोषविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास घाटंजी पोलीस ठाण्याचे ठाणेदार मनीष दिवटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक किशोर भुजाडे करत आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: