दरवाढीचा सपाटा कायम ; सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले, हा आहे आजचा दर


हायलाइट्स:

  • पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा सलग सातव्या दिवशी कायम ठेवला.
  • आज सोमवारी देशभरात पेट्रोल ३० पैसे आणि डिझेल ३५ पैशांनी महागले.
  • दरवाढीने ग्राहकांचे कंबरडे मोडले असून सणासुदीत महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.

मुंबई : कच्च्या तेलाच्या महागाईचा भार ग्राहकांवर लादणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा सलग सातव्या दिवशी कायम ठेवला. आज सोमवारी देशभरात पेट्रोल ३० पैसे आणि डिझेल ३५ पैशांनी महागले. इंधन दरवाढीने ग्राहकांचे कंबरडे मोडले असून सणासुदीत महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.

सेन्सेक्स-निफ्टी सुस्साट! ‘या’ गोष्टी ठरवणार भांडवली बाजाराची पुढील दिशाकच्च्या तेलातील महागाईच्या पार्श्वभूमीवर सलग सात दिवस कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावला आहे.ऑक्टोबरमध्ये पेट्रोल २.८० रुपयांनी महागले आहे तर डिझेल ३.३० रुपयांनी महागले आहे.

केंद्र सरकारचा विक्रीचा धडका; एअर इंडिया विकली आता ‘या’ कंपनीची होणार विक्री
आज झालेल्या दरवाढीनंतर आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ११०.३८ रुपयांपर्यंत वाढला. दिल्लीत पेट्रोल १०४.४४ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.७६ रुपये इतका वाढला आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०५.०५ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११२.९६ रुपयांपर्यंत वाढला आहे. बंगळुरात पेट्रोल १०८.०४ रुपये झाले आहे.

सणासुदीत खाद्यतेल महागले; भाववाढ रोखण्यासाठी सरकारने उचलले हे पाऊल
आज मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव १०१.०० रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ९३.१८ रुपये आहे. चेन्नईत ९७.५६ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९६.२४ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव १०२.२५ रुपये असून बंगळुरात डिझेल ९८.२५ रुपये आहे.

नियमित वेतन नसणाऱ्यांनाही मिळेल कर्ज; श्रीराम हाऊसिंग फायनान्सने आणली ‘ही’ योजना
जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा मर्यादित असल्याने युरोपात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे तेलाचे काँट्रॅक्टस तेजीत असल्याचे कमॉडिटी विश्लेषकांचे म्हणणे आहे. परिणामी इंधन दर सातत्याने वाढत आहेत. आज सोमवारी सिंगापूरमद्ये ब्रेंट क्रूडचा भाव ०.५२ डॉलरने वधारला आणि ८२.९१ डॉलर प्रती बॅरल झाला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.६७ डॉलरने वधारून ८०.०२ डॉलर झाला. नोव्हेंबर २०१४ नंतर पहिल्यांदाच अमेरिकन बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ८० डॉलरवर गेला आहे.

गेल्या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात शुक्रवारी अमेरिकेत ब्रेंट क्रूडचा भाव ०.४४ डाॅलरने वधारून ८२.३९ डाॅलर झाला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १.०५ डाॅलरने वाढला आणि तो ७९.३५ डाॅलर प्रती बॅरल झाला होता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.