शिवाजी पार्क नव्हे, यंदा ‘या’ ठिकाणी होणार शिवसेनेचा दसरा मेळावा


हायलाइट्स:

  • शिवसेनेचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कवर नाही!
  • शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली माहिती
  • जोष आणि जल्लोष कायम असेल – संजय राऊत

मुंबई: शिवसेनेच्या स्थापनेपासून दादर येथील शिवाजी पार्कवर दरवर्षी होणारा ऐतिहासिक दसरा मेळावा यंदा सलग दुसऱ्या वर्षी अन्य ठिकाणी होणार आहे. करोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याची चिन्हं दिसू लागल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. (shiv sena’s Dussehra Rally will be held at Shanmukhananda Hall)

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर व उद्धव ठाकरे यांच्या रूपानं शिवसैनिक मुख्यमंत्रिपदी बसल्यानंतरचा हा दुसरा दसरा मेळावा आहे. मागील वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाइन घेण्यात आला होता. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात अगदी मोजक्या नेत्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांचं भाषण झालं होतं. हे भाषण शिवसैनिकांनी ऑनलाइन ऐकलं होतं.

वाचा: ‘पोलीसच दुकानं बंद करायला सांगताहेत, ही कुठली पद्धत? हे कुठलं राज्य?’

यंदा करोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळं दसरा मेळावा ऑनलाइन होणार नाही, असं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळं यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार, अशी शक्यता होती. मात्र, खुद्द राऊत यांनीच आज याबाबत माहिती दिली. दसरा मेळावा शिवाजी पार्कवर नव्हे तर षण्मुखानंद सभागृहात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होईल, असं त्यांनी सांगितलं. हा मेळावा ५० टक्के शिवसैनिकांच्या उपस्थितीत होणार असला तरी त्याच जोषात होईल, असं संजय राऊत यांनी आज सांगितलं.

वाचा: बंद आणि विरोध हाच यांचा धंदा आहे, त्यावरच ‘चंदा’ गोळा होतो: भाजप

करोनाचं संकट अद्यापही पूर्णपणे गेलेलं नाही. शिवाय, गेल्या काही दिवसांत मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं निदर्शनास येत आहे. करोनाच्या संकटाशी सामना करण्याच्या बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुरुवातीपासूनच अत्यंत गंभीर आहेत. कोविड टास्क फोर्सच्या सुचनांना अनुसरूनच ते प्रत्येक निर्णय घेत आहेत. आता दुसरी लाट ओसरल्यानंतरही या बाबतीत ते कुठलाही धोका पत्करण्याची शक्यता नाही. त्यात शिवसेना हा सत्ताधारी पक्ष असल्यानं त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. याच अनुषंगानं शिवसेनेनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: