‘या’ लशीची ब्लू प्रिंट चोरून रशियाने तयार केली ‘स्पुटनिक व्ही’ लस; ब्रिटनचा खळबळजनक दावा
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात मॉस्कोमध्ये झालेल्या सुरुवातीच्या दोन क्लिनिकल चाचणीचे परिणाम, निकाल ब्रिटनमधील वैद्यकीय नियतकालिक ‘द लॅन्सेंट’मध्ये प्रकाशित झाले होते. रशियन लस स्पुटनिक व्हीमध्येदेखील ऑक्सफर्ड-अॅस्ट्राजेनेका लशीचे तंत्रज्ञान वापरल्याची चर्चा सुरू होती.
मागील वर्षी करोना महासाथीच्या आजाराने जगभरात थैमान घातले असताना अमेरिका, ब्रिटनसह इतर काही देशांमध्ये लस संशोधन सुरू होते. त्याच दरम्यान ऑगस्ट २०२० मध्ये रशियाने लस विकसित केल्याची घोषणा करत लशीला आपात्कालीन वापरासाठी मंजुरीही दिली होती. रशियाच्या या घोषणेनंतर जगभरात खळबळ उडाली होती. रशियाच्या स्पुटनिक व्हीवरही अनेक पाश्चिमात्य देशांनी प्रश्नचिन्ह उभे केले होते.