kashmir encounter : जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये दहशतवाद्यांशी चकमक, ५ जवान शहीद


श्रीनगरः काश्मीरच्या पूंछच्या सोरनकोटमध्ये दहशतवाद्यांशी सुरू असलेल्या ( 5 Jawans Martyred In Kashmir ) चकमकीत आज एक जेसीओ आणि ४ जवान असे एकूण ५ जण शहीद झाले. या भागात तीन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना ( counter terror operation in poonch ) मिळाली होती. यानंतर ही चकमक सुरू झाली. भेट अजूनही चकमक सुरू आहे. विशेष म्हणजे सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांविरोधात मोहीम राबवली जात आहे. यापूर्वी सोमवारी जम्मू -काश्मीरच्या अनंतनाग आणि बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आणि एक पोलीस जखमी झाला.

पूंछ सेक्टरमध्ये ही चकमक सुरू आहे. या चकमकीत लष्कराचा एक अधिकरी (JCO) आणि ४ जवान असे एकूण ५ जण शहीद झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.

JK: ‘दहशतवाद्यांना सहानुभूती’चा आरोप, ७०० हून अधिक पोलिसांच्या ताब्यात

दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी अनंतनाग जिल्ह्यातील वेरीनाग भागातील खगुंडमध्ये नाकाबंदी करून शोधमोहीम सुरू केली. या शोध मोहीमेदरम्यानन दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केल्याने चकमकीत उडाली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

Targeted Killings In JK: ‘जम्मू-काश्मीरच्या सामान्य नागरिकांकडून हिंसा आणि हत्यांचं समर्थन नाही’

अनंतनागमधील चकमकीत एक दहशतवादी ठार झाला, तर एक पोलीस जखमी झाला. मोहीम अजूनही सुरू आहे. दुसरी, चकमक बांदीपोरा जिल्ह्यातील हाजीन भागातील गुंडजहागीरमध्ये झाली. तिथे लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याचा खात्मा केला गेला, असे ते म्हणाले. ठार झालेला दहशतवादी हा लष्कर-ए-तोयबा (टीआरएफ) होता आणि इम्तियाज अहमद डार असं त्याचं नाव होतं. शाहगुंड बांदीपोरामध्ये एका नागरिकाची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. या हत्येत हा दहशतवादी सामील होता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: